Dana Cyclone Updates : महाराष्ट्रात मान्सून जाऊनही पाऊस का ?चक्रीवादळाचा किती फटका ?

Описание к видео Dana Cyclone Updates : महाराष्ट्रात मान्सून जाऊनही पाऊस का ?चक्रीवादळाचा किती फटका ?

#BolBhidu #DanaCyclone #OdishaWeather

चक्रीवादळं ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. अति मुसळधार पाऊस आणि विध्वंसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, कुठे घरांचे दुकानाचे पत्रे उडाले तर काही घरांमध्ये पाणीही शिरलं आहे. ताशी 120-125 किमी वेगानं ओडिशाच्या किनारपट्टी भागावर दाना चक्रीवादळ आदळलं असून इथं आता वादळाचा लँडफॉल सुरु झाला आहे. हे वादळ ताशी 120 किमी इतक्या वेगानं धडकल्यामुळं सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस आणि खवळलेला समुद्र असंच भीतीदायक चित्र दिसत आहे. हे तीव्र चक्रीवादळ ओडिशाच्या पुरी आणि सागर बेटाजवळ असलेल्या धामराजवळ जमिनीवर आलेले आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये या वादळाचे सर्वाधिक परिणाम दिसणार असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आपत्ती व्यवस्थापन विभागानं सतर्कतेची पावलं उचलली आहेत. रेल्वेसेवा आणि विमानसेवांवरही या चक्रीवादळाचा परिणाम झाला असल्यामुळं प्रवाशांचाही खोळंबा झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रावर या वादळाचा कोणताही परिणाम हा होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत आता हे असं सांगितलं जात असतानाच कमीजास्त प्रमाणात राज्याच्या हवामानावरही वादळाचे परिणाम दिसून येत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा चक्रीवादळाचा विषय समजून घेयूयात आणि मान्सून परत गेलेला असूनही अजून पावसाळी वातावरण का आहे आणि पाऊस का पडतोय हे समजून घेऊया.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке