Kairichi Bhaji | कैरीची भाजी

Описание к видео Kairichi Bhaji | कैरीची भाजी

Kairichi Bhaji | कैरीची भाजी | Kairichi Bhaji Recipe in Marathi | कैरीची भाजी कशी करावी | कैरीची भाजी रेसिपी | कैरीची चटणी | कैरीची आमटी | Kairichi Chutney | Raw Mango Curry

#KairichiBhaji
#KairichiChutney
#RawMangoCurry
#SwatiGadekarRecipe

महाराष्ट्रीयन कैरीची भाजी ही तिखट-गोड कैरीची (कच्चा आंबा) बनवलेली एक चवदार आणि चटकदार भाजी आहे.

कैरी हि भारतातील आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थ तयार करण्यासाठी विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो.

आपल्याला रोजच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रीयन कैरीची भाजी तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत एक उत्कृष्ट पर्याय आहे. हि भाजी तुम्हीही करून बघा व ती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.

साहित्य-
१) कैरीच्या फोडी - अर्धा किलो
२) किसलेला गूळ - एक वाटी
३) लाल तिखट- एक ते दीड चमचा
४)लसूण पेस्ट - एक चमचा
५) जिरे-मोहोरी - एक चमचा
६) चवीनुसार मीठ
७) गरजेनुसार तेल
८) सजावटीसाठी कोथिंबीर

कृती-
अगोदर एका काढईत तेल गरम करून घ्यावे, तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून चांगली तडतडू द्यावी त्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट तसेच हळद व लाल तिखट घालून नीट परतून घ्यावे. आता यात कैरीच्या फोडी घालून चांगले परतून घ्यावे .

कैरीच्या फोडी नीट परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्यावे. आता यामध्ये किसलेला गूळ घालून नीट एकजीव करून घ्यावे. भाजीला आता थोडे पाणी सुटेल, त्यामुळे भाजी पुन्हा एकदा नीट परतून घ्यावी म्हणजे किसलेला गूळ सर्व भाजीला लागेल. साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवून गॅस बंद करावा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवावी. तोंडलावण्यासाठी ह्या भाजीचा वापर करता येईल.

Комментарии

Информация по комментариям в разработке