जॅकी 9218 हरभरा || सर्वात जास्त उत्पादन देणारे हरबरा वाण | Jaki 9218 Harbhara |

Описание к видео जॅकी 9218 हरभरा || सर्वात जास्त उत्पादन देणारे हरबरा वाण | Jaki 9218 Harbhara |

जॅकी 9218 हरभरा || सर्वात जास्त उत्पादन देणारे हरबरा वाण | Jaki 9218 Harbhara | #जॅकी9218 #हरभरा

#जॅकी9218|
#jacky9218|
#Jaki9218harbhara|
#जॅकी9218हरभरा|
#सर्वातजास्तउत्पादनदेणारेहरबरावाण|
#sarvatjastutpadandenareharbhara|
#उदासीतंत्रहरभरा|
#हरबरापेरणीउदासीतंत्र|
#हरभरापेरणीयोग्यअंतर|
#बागायतीकोरडवाहूसाठीहरबरावाण|
#हरबरालागवड|
#9218हरबरा|


आज आपण या व्हिडिओ मधे हरभरा वाण जॅकी 9218 या विषयी माहिती बघणार आहोत.
सोयाबीन काढणी नंतर आता आपली हरबरा पेरणी ची तयारी चालू झाली आहे. तस पाहल तर हरबरा हे पीक आपल्यासाठी काही नवीन नाही. खूप वर्षापासून आपण हरबरा हे पीक घेत असतो.त्यासाठी आपण सर्वात जास्त महत्व देतो ते म्हणजे पेरणीसाठी वापरले जाणारे बियाणे ...
पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या.उत्पादन हे फक्त आणि फक्त कोणते बियाणे वापरले होते यावर अवलंबून नसते तर खूप गोष्टी त्याला कारनिभुत असतात.जसे आपले बियाणे कोणते आहे त्यांनतर बियाणे बीजप्रक्रिया केली होती का? ,आपली जमीन कशी आहे? म्हणजे बागायती आहे की कोरडवाहू आहे
,आपण पेरणी कधी केली आहे ?
आपला पेरणी चा टाईम साधला गेला आहे का?
एकरी किती बियाणे वापराले आहे? फवारणी व्यवस्थापन ,खत व्यवस्थापन ,पाणी व्यवस्थापन कसे आहे.
या सर्व गोष्टी वर उत्पादन अवलंबून असते.ह्या वरील सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर नक्कीच आपल्याला अपेक्षित उत्पन्न होईल.
तर आता आपण हरबरा वाण जॅकी 9218 बद्दल माहिती बघु.
जॅकी 9218 ही महाराष्ट्रात जवळपास सर्वात जास्त आवडीने लावली जाणारी हरबरा जात आहे.
ही जात मर रोगास प्रतिकारक्षम आहे म्हणजे या वानात मर रोगाचं प्रमाण खूपच कमी आहे.
मध्यम कालावधीत म्हणजेच 105 ते 110 दिवसात येणारे हे वान आहे.बागायती आणि कोरडवाहू दोन्ही जमिनीत या वाणाचे चांगले रिझल्ट आहेत त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ अश्या कमी पाणी असलेल्या भागात सुद्धा हे हरबरा वान खूप चांगला रिझल्ट देते.
उत्पादनाचा विचार केल्यास एकरी 13 ते 14 क्विंटल पर्यंत लोकांनी उत्पन्न घेतलेली आहेत.या हरबरा वाणाचा आकार मध्यम स्वरूपाचा आहे त्यामुळे याचे आपण एकरी 25 ते 28 किलो पर्यंत प्रति एकर बियाणे पेरणी करावी.
आपली जमीन कशी आहे याचा विचार करून आपण 3 ते 4 किलो बियाणे कमी जास्त करू शकता. हरबऱ्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी साठी 1 लाख 33 हजार झाड संख्या एका एकरात असणे आवश्यक असते.तरच इतके उत्पादन घेता येईल.यासाठी पेरणी दोन ओळीतील अंतर 30 सेंटिमीटर आणि दोन बियानामधील अंतर 10 सेंटिमीटर घ्यावे.हे अंतर कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केलेले आहे.यात तुम्ही आपल्या जमिनी नुसार बदल करू शकता म्हणजे बागायती चांगली जमीन असेल अंतर तुम्ही थोड वाढवू शकता जसे दोन ओळीतील अंतर 40 ते 45 सेंटिमीटर तर दोन बियानातील अंतर 14 ते 15 सेंटिमीटर इतक
घेऊ शकता.अंतर घेताना आपण आपला अनुभव आपली जमीन आणि व्यवस्थापन विचारत घेऊनच अंतर कमी जास्त करावे. कारण चांगल्या जमिनीत या वाणाची वाढ चांगली होते आणि झाड मोठा डेरा बनवते.चांगल्या उत्पादनासाठी बियाण्याची बीजप्रक्रिया अवश्य करा.यासाठी आपण चॅनल वरील हरबरा बीजप्रक्रिया व्हिडिओ बघु शकता.
काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारा.
धन्यवाद ✌️

Комментарии

Информация по комментариям в разработке