शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural

Описание к видео शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural

शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural । SNN Agricultural #Custard_apple_farming #snn_agricultural #कांदा_बाजारभाव #agricultural_news #शेती_बातम्या #कृषी_सल्ला #शेती_यशोगाथा #bajarbhav #सीताफळ_शेती
Custard apple farming
Kriya by ASHUTOSH   / grandakt  
Creative Commons — Attribution-ShareAlike 3.0 Unported — CC BY-SA 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/3jCyAj6
Music promoted by Audio Library    • Kriya – ASHUTOSH (No Copyright Music)  


––––––––––––––––––––––––––––––
There Was A Time by Scott Buckley   / scottbuckley  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/3GbbfPI
Music promoted by Audio Library    • There Was A Time – Scott Buckley (No ...  
––––––––––––––––––––––––––––––
––––––––––––––––––––––––––––––
Birthday by LiQWYD   / liqwyd  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/-birthday
Music promoted by Audio Library    • Birthday – LiQWYD (No Copyright Music)  
––––––––––––––––––––––––––––––
सीताफळ प्रोसेसिंग मधून कोटींची उलाढाल..

सिताफळला कमी दर मिळाला म्हणून पट्ठ्याने पल्पची कंपनी सुरु केली

हे आहेत राजकुमार अतकारे पोस्ट खात्यात नोकरीं करीत आपल्या मोहोळ तालुक्यातील देगांव येथील असलेल्या 10 एकर शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या शेतात सीताफळ, आंबा, पेरू, चिक्कू, नारळ अशी अनेक झाडें आहेत. शेतामध्ये पाण्याचा आभाव असल्याने त्यानी कमी पाणी लागणाऱ्या सीताफळाची दोन एकरवर लागवड केली. सुरुवातीचे तीन वर्ष म्हणजे फळं धारणा होई पर्यंत या पिकाला पाणी लागते त्यांतर ते अतिशय कमी पाण्यावर जगते त्यामुळे आतकरे यांनी सीताफळची लागवड केली.
त्यांनी 10 बाय 15 च्या अंतरावर सिताफळची रोपे लावली जेणेकरून मनुष्यबळ कमी लागेल ट्रॅक्टरने फवारणी करता येईल असे नियोजन केले. व पाण्याचा आभाव असल्याने त्यांनी पाण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात 200 बाय 200 बाय 39 फूट खोल असणारे तब्बल 1 कोटी लिटर पाणी साठा होईल असं शेततळ तयार करीत ठिबक सिंचन व्यवस्था केली आहे.
सिताफळला ते रासायनिक खतांचा मारा न करिता शेणखत घालतात त्यामुळे त्याचा गोडवा अजून वाढतो..त्याचं बरोबर सोलापूर जिल्ह्यातील वातावरण या फळा साठी पोषक आहे.

कष्टाने सिताफळाच्या लावलेल्या झाडांना फळे लागली... अन् बाजारात भाव कोसळले....आणि तेथूनच राजा व राणी या ब्रँडचा उदय झाला. त्याचं असं झालं
सुरुवातीच्या वर्षी सिताफळे हाती आल्यानंतर त्याला 150 रुपये किलो भाव मिळाला.
नंतर पुन्हा दुसऱ्या हंगामात सिताफळे लागली. पण बाजार कोसळला. व्यापाऱ्यांनी सिताफळाला 30 रुपये किलो भाव सांगितला. कष्टाने लावलेल्या सिताफळाला भाव कमी झाले तर ते कमी भावात विकायचेच नाही म्हणून त्यांनी ती सीताफळे घरी माघारी आणली आणि त्यावर प्रक्रिया करून उप पदार्थ बनवायचा निर्णय घेतला.. ते मोहोळ कृषी विज्ञान केंद्रात गेले. तेथील शास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून सिताफळचा पल्प करण्याचे ठरवले. त्यांनी यंत्रसामुग्री खरेदी करून पल्प तयार केला. पल्पला 300 रुपये किलो भाव मिळेल,30 रुपयांच्या सिताफळला 300 रुपये भाव मिळत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढे जाण्याचे ठरवले. शेतात काम करण्यासाठी अडचणी येत होत्या. 24 तास पाणी, लाईट लेबर या सर्व प्रश्नांवर मात करीत त्यांनी चिंचोलो midc मध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग युनिट तयार केल. पल्प काढण्यासाठी मशीनची खरेदी केली आणि काम अजून सोप्प झाल.त्यांच्याकडे असलेला पल्प हा अस्सल असल्याने त्यांनी पल्पपासून काय बनवून स्वतः विकता येईल, याचा शोध सुरु केला. आणि त्यांनी सीताफळ रबडी बनवायला सुरुवात केली ओरिजनल उत्पादने असल्याने भाव चांगला मिळाला व त्याची रबडी प्रसिद्ध ही झाली. त्यांना त्याला आपलं व आपल्या पत्नीचे नाव देत स्वतःचा राजा राणी ब्रँड निर्माण केला. त्यानंतर त्यांनी तेथच न थांबता सीताफळ बासुंदी, सीताफळ आईस्क्रीम, कुल्फी अशी अनेक उत्पादने सुरु केली त्यामध्ये ते कोणता ही रंग किंवा केमिकलं वापरत नाहीत. मार्केट मध्ये त्यांनी राजाराणी स्वतःच्या ब्रँड चे आउटलेट सुरु केले.आता सोलापूर, पुणे, शिरूर या ठिकाणी त्यांचे आउटलेट आहेत व त्यांना चांगला प्रतिसात ही मिळत आहेत. शेतकऱ्याच्या बांधवरून ते ग्राहकांच्या दारात अशी कल्पना सकारून या
राजा राणीने बाजाराला हरवत स्वतःच स्थान निर्माण केल आहे

SNN Agricultural मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून SNN Agricultural चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . SNN Agricultural मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता SNN Agricultural तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार SNN Agricultural नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . SNN Agricultural च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Follow us for more latest updates :

Комментарии

Информация по комментариям в разработке