मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय किंवा औषध |मासिक पाळी येण्यासाठी काय करावे|

Описание к видео मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय किंवा औषध |मासिक पाळी येण्यासाठी काय करावे|

काही जणींना या दिवसात होणारा त्रास, तर या चार दिवसात विविध गोष्टींना सामोरं जावं लागतं. कधीकधी काही कामानिमित्त बाहेर जायचं असतं नेमकं तेव्हाच अथवा कोणत्याही सणासमारंभाच्या दिवशीच मासिक पाळीचा त्रासही सहन करावा लागतो. अशावेळी मासिक पाळी लवकर यायला हवी असते. मग काही जणी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मासिक पाळी लवकर आणण्यासाठी गोळ्या घेतात. पण त्यासाठी तुम्ही घरगुती गोष्टींचा अवलंबदेखील करू शकता. खरं तर मासिक पाळी येण्याची तारीख आणि वार हा परफेक्ट ठरलेला नसतो. साधारण 28 दिवसांनी पाळी येते. पण काही जणींच्या बाबतीत ही तारीख बऱ्याचदा मागेपुढे होत असते. कधीतरी असं होतं की, दिवस उलटून गेले तरीही मासिक पाळी येत नाही. अशावेळी आपली अधिक चिडचिड होत असते. पाळी उशीरा आली किंवा खूप आधी आली तर या दोन्हीही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. पाळी वेळेवर येणं म्हणजे आपण निरोगी असणं. त्यामुळे असं कधी झालं तर तुम्हाला मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय उपाय करता येतील हे आजच्या व्हिडीओ मध्ये जाऊन घेणार आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке