श्रावणअष्टमीसी | पंत महाराज बाळेकुंद्री भजन | दत्त प्रेमलहरी पद १६७६ | datta premlahari pad 1676

Описание к видео श्रावणअष्टमीसी | पंत महाराज बाळेकुंद्री भजन | दत्त प्रेमलहरी पद १६७६ | datta premlahari pad 1676

श्रावणअष्टमीसी परब्रह्म अवतरलें । दर्शनमात्रें मूढ जनासी सहज तारियलें ।। धृ० ।।
शरण येतां कृपा करूनी पदरीं घेतलें ॥ अंकीं घेउनी आपुला म्हणवुनी सहज उद्धरिलें ॥ १ ॥ सेवा साधन कांहीं नसतां निजतत्व बोधियलें ।। बोधानंदें स्वरूप दें अंतर निवविलें ॥ २ ।। दत्तावधूत बालमुकुंद स्वरूप प्रगटलें ।। बोधमार्ग हा सुलभ करूनी । कैवल्य दिधलें ।। ३ ।।

श्रावण महिन्यांतील बद्य अष्टमीस, कृष्णजन्मदिनी अशा गोकुळाष्टमीस, अद्वय आत्मा तेच परब्रह्मस्वरूप होय. असा परब्रह्मस्वरूप माझा सद्गुरू बालमुकुंद हा सगुण मनुष्य देहधारी रूपाने या धरणीवर पार्शवाडगावी सगुण रूपाने प्रगटला. अवतार धारण केला. आणि आपल्या केवळ दर्शनाने, भेटीने अनेक अज्ञानी, मायिक अशा मूढ लोकांचा, त्यांना काही एक प्रयत्न न करू देतां, त्यांचा उध्दार केला ! स्वस्वरूपाची ओळख करून दिली. ।।धृ।। त्या सद्गुरू बालमुकुंदास शरण गेलो असतां, त्याने मजवर कृपा करून, आपल्या पदरांत घेतले! मला आश्रय दिला! बालकाप्रमाणे माल आपल्या मांडीवर घेऊन, अनुग्रह देऊन, आपला म्हणून, सायास न करितां माझा उध्दार केलास. मायापाशांतून मुक्त करून, मला स्वस्वरूपाची प्राप्ति करून दिलीस. ।। १ ।। मी त्या सद्गुरूची सेवा, चाकरी,
पूजा, आराधना काहीहि केली नाही. तसेच परमार्थ प्राप्तिसाठी करावे लागणारे नाना सायास माझे अंतःकरण शांत केले! मला गुरूने संतुष्ट केले ! ।।२ ।। सर्वसंगरहित असा दत्तात्रय गुरू तोच बालमुकुंद आहे. त्याचे स्वरूप अगर आत्मस्वरूप माझ्या हृदयांत प्रकाशित झाले! आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीचा हा अवधूत मार्ग, मला सहज हसत खेळत, व्यवहार करीत असतांना, विनोद करून, आत्मबोध सांगून, "स्वस्वरूपाची अखंड भेट तेच कैवल्य आहे". ह्या कैवल्याची प्राप्ति गुरूने करून दिली ! ॥३ ॥
#भजन #bhajan #दत्तभजन
#पंतमहाराजभजन #पंतमहाराजबाळेकुंद्री #pantmaharajbalekundri

Комментарии

Информация по комментариям в разработке