माझा हस्तक्षेप : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सरकार घाबरलं?

Описание к видео माझा हस्तक्षेप : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सरकार घाबरलं?

पुण्याहून नाशिकला निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा काल सिन्नर पोलिसांनी नांदूरमध्ये अडवला. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. आपल्या हक्कासाठी तब्बल चार दिवसांपासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डांबण्याचा पराक्रम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी केला आहे. शासकीय वसतीगृहांमधील अनास्थेविषयी विशेषतः जेवणाच्या अनास्थेविषयी तक्रारीनंतर सरकारनं या विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जेवण भत्ता देण्याची तयारी केलेय.. पण यापूर्वीचे इतर काही प्रकराचे भत्ते 6-6 महिने थकलेले असताना जेवणाही भत्ता स्वरूपात मिळणार आहे.. आणि हा भत्ता थकला तर गरीब आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळ या विद्यार्थ्यांनी या आणि इतर मागण्यांसाठी सरकारविरोधात मोर्चा काढला.. मात्र सरकारनं यांची बाजू ऐकून घेण्याऐवजी थेट पोलिस कारवाई या विद्यारथ्यांवर केली. या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि कॅमेराची तोडफोड करण्यात आली होती. आज पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले. आणि विरोधकांनी सरकारच्या नावानं बोंबा ठोकल्या... मात्र मुख्यमंत्र्यांनी थेट या विद्यार्थ्यांचे दावे खोडून काढणारं वक्तव्य केलंय.. वसतीगृहात अनधिकृत पद्धतीनं राहणारे विद्यार्थी ही ओरड करत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.. मुळात वसतीगृह शासकीय, त्यातील अधिकारी सरकारी, तिथले ठेके सरकारकडून देण्यात येतात मग तिथे अनधिकृत विद्यार्थी असतील कसे आणि असलेच तर त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सरकारची आहे.. मग त्याची शिक्षा या गरीब विद्यार्थ्यांना का दिली जातेय.. हा प्रश्न आहे आणि या प्रश्नात चर्चेच्या माध्यमातून आम्ही हस्तेप करत आहोत..

Комментарии

Информация по комментариям в разработке