केंद्रीय मंत्रिमंडळ शपथविधी

Описание к видео केंद्रीय मंत्रिमंडळ शपथविधी

केंद्रीय मंत्रीमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडला. ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये झालेल्या या शपथविधी समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ४३ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नव्या मंत्रिमंडळात मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकातल्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात सात महिलानांही स्थान मिळालं आहे.
काल झालेल्या शपथविधी समारंभात पंधरा जणांना कॅबिनेट मंत्री पदी तर २८ जणांना राज्यमंत्री म्हणून राष्ट्रपतींनी शपथ दिली.
काल झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात पाच राज्यमंत्र्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलं.
काल झालेल्या शपथविधी समारंभात महाराष्ट्रातून चारजणांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. यात कॅबिनेट मंत्री म्हणून नारायण राणे, तर कपिल पाटील, डॉ भागवत कराड आणि डॉ भारती पवार यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नव्या मंत्र्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке