जीवनाला सोपं करणारं प्रवचन - बाबा महाराज सातारकर Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan baba maharaj

Описание к видео जीवनाला सोपं करणारं प्रवचन - बाबा महाराज सातारकर Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan baba maharaj

‪@maybolikatta‬
बाबा महाराज सातारकर यांचे नव नवीन प्रवचणासाठी मायबोली कट्टा या चॅनेल ला नेहमी भेट द्या.
बाबा महाराजांची मौलिक कीर्तन फक्त मायबोली कट्ट्यावर उपलब्ध यासाठी मायबोली कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाबा महाराजांचे मौलिक कीर्तन केवळ मायबोली कट्टा वरच ऐकायला मिळेल .
बाबा महाराजांचा थोडक्यात परिचय -
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ( सातारकर महाराज )यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून असलेली कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
१९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली . आज उभा महाराष्ट्र त्यांच्या मधुर वाणीयुक्त प्रवचनाने वेडा झालेला आपण पाहतो. बाबा महाराजांचे किर्तन ही जणू काही एक पर्वणीच असते.

Комментарии

Информация по комментариям в разработке