Amrutbol | Part 3 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)

Описание к видео Amrutbol | Part 3 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)

मानवी शरीराकडे आजवर दुर्लक्षच करण्यात आलेलं आहे. आपल्या शरीराची काळजी करणं सोडाच पण माणूस साधं शरीराकडे जाणीवपूर्वक पाहत देखील नाही. पण संसार असो वा परमार्थ शरीराशिवाय तुम्हाला काहीच साध्य होऊ शकत नाही. यासाठी ऐका शरीर साक्षात परमेश्वर या विषयावरील हे मार्गदर्शन..

#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai

प्रबोधनाचे वैशिष्ट्य-

-आपण शरीराला neglect केलेले आहे.
-आरश्यात आपण फक्त आपण कसे दिसतो हे बघतो, शरीराकडे कधी बघत नाही. आपल्याला शरीराकडे आणि परमेश्वराला पाहायला वेळ नाही कारण आम्ही संसारात गुंतलेले आहोत.
--परमेश्वर समजला की, शरीर साक्षात परमेश्वर कसे हे कळायला सोपे आहे. लोकांनी परमेश्वर विषय गुंतागुंतीचा केला.
--परमेश्वराबद्दल ज्ञान महत्वाचे आहे. लोकांनी परमेश्वराच चित्रिकरण केलं, मूर्तीकरण केलं, व्यक्तीकरण केल. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे परमेश्वरच personification केलं त्यामुळे तो विषय गुंतागुंतीचा झाला.
--जीवनविद्येने सर्व गोष्टींचे चिंतन केलं की, सर्व प्रकारचे कर्मकांड करून माणसाची परिस्थिती सुधारलेली नाही उलट आधिकच बिघडलेली आहे.
--विज्ञानाने माणसाची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली कारण विज्ञानाचा योग्य वापर करता आलं नाही. विज्ञान चांगलं आहे पण त्याचा योग्य तो वापर झाला पाहिजे.
--तुझ्याकडे पहाण्याची दृष्टी असेल तर पहाशील तिकडे परमेश्वर दिसेल, अन्यथा कुठे पाहिले, कसेही पाहिले तरी देव दिसणार नाही.
--दिव्यत्वाची प्रचिती पावलो पावली येणार. पहाशील तिकडे देव दिसेल. सूर्य, चंद्र, पर्वत, डोंगर, पाण्याचे झरे, नदी, समुद्र, पाऊस, ढग, माणसं हे सगळं दिव्यत्वाची प्रचिती आहे.
--वृक्ष हे शंकराचे अवतार आहेत कारण ते Carbon dioxide घेतात आणि Oxygen देतात, विष घेऊन अमृत देतात.
--तुम्ही हवं आणि नको मध्ये गुंतलेले आहात म्हणून तुम्हाला दिव्यत्व दिसत नाही. हवं ते मिळवण्याचा आणि नको ते टाळण्याचा प्रयत्न ह्याला संसार म्हणतात. आणि लोक या संसारात गुंतलेले असतात.
--जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवा धर्माच्या नांवाखाली खूप काही करत असतात पण त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो.
--जीवनविद्येने नवीन नवीन सिंद्धात मांडले त्यात परमेश्वर कोणावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही हा क्रांतिकारी सिद्धांत जीवनविद्येने मांडला.
--हा सिद्धांत जर मानव जातीने स्वीकारला तर धर्माच्या नावाखाली जो गोंधळ चालू आहे तो कमी होईल. धर्मांतर हा प्रकार बंद होईल. धर्मांतर हा प्रकार अर्थ शुन्य आहे. किंबहुना अनर्थ निर्माण करत आहे.
--आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती सर्व ठिकाणी आली पाहिजे. दिव्यत्वाची प्रचिती कशी घ्यायची तर systentized order ह्या पद्धतीने.
--निसर्गनिमयांसहित स्वयं चलित, स्वयं नियंत्रित, नैसर्गिक पद्धतशिर व्यवस्था म्हणजे परमेश्वर अशी परमेश्वराची व्याख्या जीवनविद्येने केली आहे.
--परमेश्वराकडून सर्व होतं पण तो काही करत नाही. हे विश्व परमेश्वराकडून निर्माण झाले तो करत बसला नाही. उदाःहरण घाम कोण निर्माण करत नाही, तो आपोआप निर्माण होतो.
--जीवन जगणं हे शास्त्र आहे . परमेश्वर हा त्याचा पाया आहे. परमेश्वर हा निसर्गनियमांनी मंडित आहे. निसर्गनियमाने बांधलेला आहे. ते नियम सर्वाना लागू होतात.
--निसर्ग नियम म्हणजे परमेश्वराचे अवयव आहेत आणि माणसाच्या जीवनात निर्णायक आहेत. निसर्गाच्या नियमाच्या आत जीवन जगायचे आहे.
--निसर्गाच्या नियमाने जीवन जगा. जीवन हे अनुष्ठान आहे . शरीर हे प्रतिष्ठान आहे आणि परमेश्वर म्हणजे अधिष्ठान आहे.
--शरीर आहे म्हणून तुला सगळे ओळखतात. शरीर आहे तर सर्व आहे . शरीर नाही तर काहीच नाही.

Subscribe our channel: https://bit.ly/jvmytsubscribe

About Satguru Shri Wamanrao Pai-

A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy – was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (http://www.jeevanvidya.org) for achieving his goal.

He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women – working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.

He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.

Like us on Facebook:   / jeevanvidya  
Follow us on:   / jeevanvidya  
Follow us on Google: https://plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: http://www.jeevanvidya.org/

Комментарии

Информация по комментариям в разработке