Eknath Shinde यांनी Vidhansabha Election 2024 च्या तोंडावर Dharmaveer -2 रिलीज का केला?

Описание к видео Eknath Shinde यांनी Vidhansabha Election 2024 च्या तोंडावर Dharmaveer -2 रिलीज का केला?

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#eknathshinde #maharashtrapolitics #dharmaveer2
धर्मवीर मुक्कास पोस्ट ठाणे हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १३ मे २०२२ ला रिलीज झाला. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. २ वर्षापूर्वी धर्मवीर सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला पाठबळ देणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणारे एकनाथ शिंदे.. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते.. या सिनेमाचं भव्य ट्रेलर लाँचही उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. सलमान खान,रितेश देशमुखही यावेळी उपस्खित होते.. शिंदेंसोबत बंड करून गेलेले डझनभर मंत्रीही तेव्हा स्टेजवर उपस्थित होते.. गद्दारांना क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमात आनंद दिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. आनंद दिघेंचं हिंदुत्व,ठाणे जिल्ह्यात त्यांनी वाढवलेली शिवसेना याचा त्यात समावेश होता. मात्र त्याचवेळी सिनेमात एकनाथ शिंदेंची इमेज बिल्डिंग करणारे प्रसंगही ठासून होते. एकनाथ कुठे आहे हा डायलॉगही तेव्हा फेमस झाला होता. या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघेंच्या मृत्यूसमयीच्या प्रसंगावरूनही बरंच राजकारण गाजलं होतं. या सिनेमाच्या प्रिमियरला उद्धव ठाकरे जातीने उपस्थित होते. मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूसमयीचा चित्रीत केलेला प्रसंग न बघताच उद्धव ठाकरे प्रिमियर सोडून निघाले होते. माध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये मी दिघेंचा मृत्यचा प्रसंग पाहू शकणार नाही. मी भावूक होईन असं सांगून उद्धव ठाकरेंनी तो प्रसंग तेव्हा पाहिला नव्हता. या सिनेमाची बरीच चर्चा झाली. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी या सिनेमाला सिनेमागृहात हाऊसफुल्ल गर्दी करत उचलून धरले होते.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке