सद्गुरूंचे असेच नवनवीन मराठीमध्ये अनुवादित व्हिडिओ पाहण्यासाठी सद्गुरु मराठी युट्युब वाहिनीला सबस्क्राईब📲👆🏻 करा आणि बेल आयकॉन🔔👆🏻 वर देखील क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडीओ यांच्या सूचना तुम्हाला सर्वप्रथम प्राप्त होतील.
सद्गुरू: हे पहा, एकदा अस घडल; एक छान ख्रिश्चन मुलीन लग्न केलं आणि सासरी गेली. तीन दिवसांनी तिने तिच्या आईला बोलावलं आणि म्हणाली, “आई, मी माझ्या नवऱ्याबरोबर इथ राहू शकत नाही. प्रत्येक वेळी तो चार अक्षरी शब्द वापरत असतो. मग आईन विचारल, “कोणत्या प्रकारचे चार अक्षरी शब्द?” ती
म्हणाली, “तो म्हणत असतो - कुक, क्लिन, वॉश, आयन.” तर, शब्द वापरण्यात काय चुक आहे?
मुख्यतः, आजकाल तुम्ही ज्याला अपशब्द म्हणता, आपल्याकडे देखील आपले स्वतःचे अपशब्द आहेत जे आपल्या भाषेस अतिशय सामान्य आहेत आणि काही अश्लीलही आहेत, काही विशिष्ट
हेतू सूचित करतात, काही आमच्या कुटुंबाना उद्देशून आहेत आणि काही फक्त एकमेकांशी गंमत
करण्यासाठी आहेत. परंतु आज तुम्ही वापरत असलेल्या इंग्रजी भाषेतील अपशब्द मुळात
अमेरिकेतून घेतले गेले आहेत, ते एकतर टोयलेट किंवा बेडरूम अरुण आहेत, बरोबर ना?
मी तुम्हाला हे सांगायला हवं. हि बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कोणीतरी, एक पाहुणे
ऑस्ट्रेलियाहून आले होते. मी सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचं बोलतोय. ऑस्ट्रेलियाहून एक पाहुणे आले होते
आणि मी त्यांना म्हैसूर परिसराची सैर करायला घेऊन जायला हवं होत. तुम्हाला माहितीये म्हैसूर हे
पर्यटनस्थळ आहे. तू बेंगळूरूचा आहेस, हं? हे एक पर्यटन स्थळ आहे. तिथं बरीच पहाण्यासारखी ठिकाण
आहेत, म्हणून मी या व्यक्तीला माझ्या मोटरसायकलवर घेऊन जात होतो. मी जोरात गाडी चालवली,
तर तो माझ्या कानात पुटपुटतो, “शिट.” मग मी विचार करतो, “मी ब्रेक मारला तर काय”, “शिट.” त्यांना काहीतरी सुंदर दिसल, “शिट”. जर जेवण खूप मसालेदार असेल तर, “ओह शिट!”मी विचार करत होतो, ही व्यक्ती दिवसभर “शिट” शब्दाचा मंत्रासारखा जप का करतेय? मला वाटलं
की कदाचित त्यांना बद्धकोष्ठ झालाय, आणि ते आळवण्याचा प्रयत्न करतायत! कारण सकाळी जे
काही केल पाहिजे, दिवसभर तुम्ही ते का खेचत आहात? मग मी पाहिल की, जेव्हा त्यांना राग येतो
“शिट.” आणि ते थोडे शांत होतात. अरे मग मी विचार केला, “अरे, हे तर त्यांच्यासाठी काम करतय. मी
ह्यात बाधा आणू नये. ”कारण कोणासाठीही जे कार्यरत आहे त्यात बाधा आणणे यावर माझा विश्वास नाही. जर हे काम करतंय, तर राहू द्या.म्हणून मी यावर विचार केला. पहा, शक्तिशाली पद्धतीने ध्वनी उच्चारण्याचे संपूर्ण विज्ञान आम्ही
पाहिलंय, ते तुमच्या चेतनेवर काय करू शकत, ते तुमच्या शरीरावर काय करू शकत, ते
तुमच्या उर्जेला बळकटी देण्यासाठी काय करू शकत, असे अनेक पैलू आणि मग आपण म्हणतो,
“शिवा”.
Download Sadhguru App 📲 http://onelink.to/sadhguru__app
Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.
Subscribe to Sadhguru Marathi YouTube Channel Here: https://www.youtube.com/sadhgurumarat...
Official Sadhguru Website
http://isha.sadhguru.org
Official Social Profiles of Sadhguru Marathi
/ sadhgurumarathi
Информация по комментариям в разработке