अमरनाथ यात्रा 2024 || Day 04 || संपूर्ण मराठी माहिती बाल्टाल मार्ग.

Описание к видео अमरनाथ यात्रा 2024 || Day 04 || संपूर्ण मराठी माहिती बाल्टाल मार्ग.

अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रूप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते.

या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पवित्र गुहेत बर्फामुळे नैसर्गिक शिवलिंग तयार होणे हे आहे. नैसर्गिक बर्फापासून निर्माण झाल्यामुळे त्याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात. संपूर्ण श्रावण महिन्यात आषाढ पौर्णिमेपासून रक्षाबंधन पवित्र हिमालिंग दर्शनासाठी लाखो लोक येथे येतात.

Комментарии

Информация по комментариям в разработке