अंकिता निंबाळकरांचा अश्रूंचा बांध फुटला! म्हणाल्या, गौतम काकडेला फाशी द्या!

Описание к видео अंकिता निंबाळकरांचा अश्रूंचा बांध फुटला! म्हणाल्या, गौतम काकडेला फाशी द्या!

#bakasur #bakasurvsmathur #bakasursharyat #mathur #bailgada #bailgada_sharyat_official #nimbutfire #kakde #gautambhaiya #ranjitnimbalkarsir #bailgadasharyat #bailgadapremi #bailgadarace #bailgadaa5000 #maharashtra #pune #govtofmaharashtra #baramati #agriculture #ajitpawar #sharadpawar #supriyasulefc

गुरुवारी मध्यरात्री 11:00 वाजल्यानंतर ते आज पहाटेपर्यंत बारामती तालुक्यात मोठी खळबळजनक घटना घडली. बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेले ट्रिपल महाराष्ट्र हिंदकेसरी गौतम काकडे यांच्या घरी बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार झाला, या गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
काल रात्री अकराच्या सुमारास गौतम शहाजी काकडे यांच्या घरी निंबूत येथे बैलाच्या पैशाच्या व्यवहारावरून गौतम काकडे यांचा भाऊ गौरव याने फलटण येथील सुंदर बैलाचे मालक रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. गोळी डोक्यात गेल्याने निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला बारामती येथे व त्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर स्वामी विवेकानंद नगर फलटण यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता या घटनेतील जखमी निंबाळकरांचे निधन झाल्याने हा गुन्हा आता खुनाचा गुन्हा म्हणून रूपांतरीत होईल.
याप्रकरणी रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबूत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजीत निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला.
यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये 27 जून 2024 रोजी देऊन हा व्यवहार स्टॅम्पवर लिहून देण्याचे ठरले होते. व्यवहार करताना आपण समक्ष हजर होतो, असे रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबूतला नेला.
27 जून 2024 रोजी सकाळी 11 म च्या सुमारास रणजीत निंबाळकर व संतोष तोडकर हे गौतम काकडे यांच्याकडे बैलाच्या व्यवहाराची चर्चा करण्यासाठी निंबूत येथे गेले होते. त्यांच्याशी चर्चा करून रणजीत निंबाळकर परत फलटण येथे दुपारी दोन वाजता पोहोचले, तेव्हा त्यांनी गौतम काकडे हे आपले बैलाचे राहिलेले पैसे न देता, तुम्ही स्टॅम्पवर सही करा असे म्हणत होते, मात्र मी पैसे दिल्याशिवाय सही करणार नाही असे म्हणून परत आलो आहे असे त्यांनी सांगितल्याचे अंकिता निंबाळकर यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे.
दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंकिता निंबाळकर, रणजीत निंबाळकर, दहा महिन्यांची मुलगी अंकुरण, नातेवाईक वैभव भारत कदम आणि पिंटू प्रकाश जाधव हे चारचाकी गाडीतून निंबूत येथे निघाले होते. लोणंद येथे आल्यानंतर संतोष तोडकर हे थांबले होते. संतोष तोडकर हे रणजीत निंबाळकर यांना म्हणाले, सर, तुम्हाला या व्यवहाराचे पूर्ण पैसे दिले आहेत, तुम्ही सही का केली नाही? त्यावर रणजीत निंबाळकर यांनी आम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळाले, बाकी पैसे अजून गौतम काकडे यांनी दिले नाहीत असे सांगितले.
त्यावेळी संतोष तोडकर यांनी मला गौतम काकडे यांनी तुम्हाला पूर्ण व्यवहाराची रक्कम दिल्याचे व व्यवहार पूर्ण केल्याचे सांगितले आहे, असे म्हणून संतोष तोडकर त्यांच्या गावाकडे निघून गेले. त्यानंतर गौतम काकडे यांनी 32 लाख रुपये नेण्यासाठी बोलवल्याने त्यांच्या घरी निंबूत तेथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंकिता निंबाळकर, रणजीत निंबाळकर व त्यांचे नातेवाईक वैभव कदम व पिंटू जाधव हे पोचले.
त्यावेळी त्यांच्या घरी आल्यानंतर गौतम काकडे व हे सर्वजण घराजवळील अंगणात बाजेवर बसले होते, तेव्हा गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत, असे का सांगितले? तुम्ही असे बोलायला नको होते, मी तुम्हाला सकाळी पैसे देतो, तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे सांगितले.
त्यावेळी रणजीत निंबाळकर यांनी माझे राहिलेले पैसे द्या, मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल, तर तुमचे पाच लाख रुपये मी तुम्हाला परत देतो, माझा बैल परत द्या असे सांगितले. त्यानंतर सगळे गाडीकडे निघाले, त्यावेळी गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना, तू बैल कसा घेऊन जातो तेच मी बघतो, असे म्हणून त्यांनी फोन लावून पोरांनो तुम्ही वर या असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी गौरव यास देखील फोन करून बोलावून घेतले गौरव व अनोळखी तीन मुले तिथे आल्यावर गौतम काकडे हे आमच्याकडे परत आले व गौतम काकडे यांनी गौरव व त्या अनोळखी तीन मुलांना, या सराला मारा लय बोलतोय हा असे म्हणाले. त्यावेळी गौरव च्या हातात काठी होती. ती काठी गौतम काकडे यांनी घेऊन तो मारण्यासाठी रणजीत निंबाळकर यांच्या अंगावर धावून शिवीगाळ केली. त्यावेळी वैभव कदम हे गौतम काकडे यांना तुम्ही वाद घालू नका आपण उद्या व्यवहार चर्चा करू असे सांगत अडवत होते.
अनोळखी तीन जण शिवीगाळ करत असताना गौरव याने तू बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाही असे म्हणून त्याच्याकडे असणाऱ्या पिस्तूल मधून रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात एक गोळी झाडली. गोळी लागताच रणजीत निंबाळकर खाली पडले. त्यानंतर गाडीतून रणजीत निंबाळकर यांना वाघळवाडी व तिथून बारामतीतील भोईटे हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

Комментарии

Информация по комментариям в разработке