#गड #धर्मवीरगड #dharmveergad
⛳🏇🏽⛳
भटकंती ,,गड दुर्गांची
धर्मवीर गड... ! ⛳
(बहादूर गड)
"राहुल दादा .....गुढी उभारायची कि नाय ,,पाडवा साजरा करायचा कि नाय ,,आम्ही खूप द्विधा मनस्थितीत आहोत,wpआणि fb वर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पोस्ट फिरतायेत काय करायचे "
ऐकून मन सुन्न होत होते,आपल्याच हिंदू धर्मातील एक पवित्र सण साजरा करताना हि अवस्था पाहून वाईट वाटते,
मात्र या वर्षी आपला गुढीपाडवा कसा साजरा करायचा या साठी आमच्या डोक्यात मात्र वेगळीच संकल्पना घोळत होती.. 17 तारखेला वढू- तुळपुर ला जाऊन आलो ,पण मनात बहादूर गडाला भेट द्यायचीच असे पक्के केले होते कारण संभाजी महाराजांना तुळापूर ला आणायच्या अगोदर संगमेश्वर वरून बहादूर गडावर कैद करून आणले होते तिथेच त्यांचे खूप हाल हाल केले गेले होते ,उंटावरून धिंड हि तिथेच काढली होती ,अनेक जालीम शिक्षा इथेच पार पडल्या होत्या ,
म्हणजे याच ,....याच गडाने सर्व काही पाहिले होते ,हाच तो गड ज्याने संभाजी महाराजांचे शेवटचे दर्शन घेतले होते ,ज्या गडाची देखभाल(मोकासा) शिवाजी राजांचे आजोबा बाबाजी भोसले यांच्या कडे पूर्वी होती ,आज त्याच गडावर त्यांचा पणतू साखळी दंडाने जेरबंद झ्हाला होता ,
दुसरे असे की याच गडावर हल्ला करून मराठ्यांनी बहादूर खान (औरंजेबाचा दूध भाऊ )याला मूर्ख बनवून राज्य भिषेकाचा सर्व खर्च 1 कोटी चा खजाना आणि 200 अस्सल इराणी घोडी लुटून वसूल करण्यात आला होता ,
पण ,आज त्याच ठिकाणी स्वराज्याचा दुसरा छत्रपती जेरबंद होता ,रक्ताने त्यांचा अभिषेक झ्हाला होता ,औरंग्याने 3 पिढींचा सगळा राग आणि त्याच्या श्रीमंत बुऱ्हाणपूराचे शंभू राज्याने केलेली स्मशान भूमी ,9 वर्ष दिलेली कडवी झुंज ,सुरत ची पुन्हा केलेली भयानक लूट ,शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज आपलेच या भ्रमात 7 लाख फौज घेऊन दक्षिणेत उतरलो एक दोन वर्षात आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य शाह्या संपावल्या पण 22 वर्षाच्या या पोराने(शंभूराजे) 9 वर्षात स्वराज्याचा एक तुकडाही जिंकू दिला नाही ,म्हणून रागाने लाला झ्हालेला औरंग्या आज शंभू राज्यांना कैदेत पाहून अल्लाचे धन्यवाद मानन्या साठी तख्त त्यागून इथेच नामाजा साठी खाली बसला होता ,
आज दरबाराचा कमानीतून आत प्रवेश केला आणि मनाची धड धड वाढत गेली,
अजूनही ते दरबाराचे अवशेष आणि ज्या स्तंभाला शंभू राजेंना बांधून ठेवले होते तो स्तंभ पाहून मन हेलावून जाते ,अगदी त्या काळातील चित्र उभे राहते , अनेक शिव शंभू प्रेमींनी या बहादूर गडाला "धर्मवीरगड"असे नाव दिले(पूर्वी पांडे पेडगाव असा उल्लेख सापडतो )
तर असा हा ई.स.1300 मधील देवगिरी काळातील भीमा नदीच्या तिरा वरील भूई कोट किल्ला पाहण्या साठी पुणे यवत -चौफुला पाटस -दौंड - पेडगाव मार्गे धर्मवीर गडावर जाता येते ,गडावर अजूनही खूप प्राचीन 4 -5 मंदिरे आहेत ,अनेक वाड्यांचे अवशेष दिसतात,
या अभ्यास मोहिमे साठी सचिन पासलकर (दौंड पोलीस)यांचे मोलाचे सहकार्य लाभले, सोबत अमित,आणि विजय शेळके सर यांचा सहभाग होता,
जय शिवराय.....⛳
लेखन
राहुल नलावडे(रायबा)
Rahul Nalawade
98 5060 2525
Информация по комментариям в разработке