Shubhvivah - Title Song | शुभविवाह | Star Pravah | Nilesh Moharir | Sharayu Date

Описание к видео Shubhvivah - Title Song | शुभविवाह | Star Pravah | Nilesh Moharir | Sharayu Date

Here's the BTS footage from the making of the title song of Star Pravah's Daily Soap "Shubhvivah"
Lyrics - Ashwini Shende Bagwadkar
Music - Nilesh Moharir
Singer - Sharayu Date
Programming - Abhishek Telang
Chorus - Aditi Prabhudesai, Pragati Joshi, Vijay Dhuri
Recorded by Rupak Thakur at RT Studio
Mixed by Ajinkya Dhapare at The Sonic Station
Camera - Swapnil Sawant
Video by Studio Autofocus
Courtesy - Tell-A-Tale Media & Star Pravah

हाती हिरवा चुडा
शालू सजला नवा
गौर पुजून मी बावरी...

गाली हळदीचा रंग
कपाळी बाशिंग
मी झाले वधू लाजरी...

दृष्ट लागेल बघ
चांदण्याला
कुणी काजळ जरा
तीट लावा
मग वाजत गाजत
वराती मागून,
साजण माझा यावा
मी झाले त्याची
सखी सखी साजिरी...

उरात हुरहुर
सुरात सनई
मुहूर्त ये लग्नाचा...
आज आपुल्या
दोन मनांचा
सौभाग्ये साजरा...

बघ विवाह हा
बघ विवाह हा
"शुभविवाह" हा झाला....

मेंदीमधुनी पुसल्या गेल्या
माहेरच्या या रेघा..
शालूच्या या गाठीमधला
अडकुनी राही धागा..

सुटल्या सा-या घरदाराच्या
हळव्या कातर शपथा..
नावही त्याचे गावही त्याचे..
मी त्याची अन आता-

झिजेल चंदन..
भरेल अंगण..
दरवळ विश्वासाचा...
डोळ्यामधल्या पाण्यालाही
देईन रंग सुखाचा...

मग विवाह हा
बघ विवाह हा
"शुभविवाह" हा झाला....

गीत - अश्विनी शेंडे बगवाडकर
संगीत - निलेश मोहरीर
गायिका - शरयू दाते
संगीत संयोजन - अभिषेक तेलंग
कोरस - अदिती प्रभुदेसाई, प्रगती जोशी, विजय धुरी
ध्वनिमुद्रण - रूपक ठाकूर (आर टी स्टुडिओ )
ध्वनिमिश्रण - अजिंक्य ढापरे (द सॉनिक स्टेशन )
कॅमेरा - स्वप्नील सावंत

Комментарии

Информация по комментариям в разработке