Mahayuti च्या जागावाटपात Ajit Pawar यांना फक्त ४० जागा मिळण्याची चर्चा, BJP कडून दादांवर अन्याय ?

Описание к видео Mahayuti च्या जागावाटपात Ajit Pawar यांना फक्त ४० जागा मिळण्याची चर्चा, BJP कडून दादांवर अन्याय ?

#BolBhidu #AjitPawar #BJP

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी महायुतीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली, जागावाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा केली. बैठकीत भाजपला १६० शिंदेंच्या शिवसेनेला ७० तर अजित पवार गटाला ४० जागा, असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. जागावाटपात भाजप वरचढ ठरत असल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गट बॅकफुटला गेलं आहे. लोकसभेनंतर आता या दोन्ही गटांना विधानसभेलादेखील तडजोड करावी लागणार असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे अजित पवार ४० आमदार घेवून महायुतीत सामील झाले होते, असं असताना त्यांची केवळ ४० जागांवरच बोळवण केली जाईल, असंही बोललं जातंय. दुसरीकडे एकनाथ शिंदेंना ७० जागा देण्यास भाजप तयार असली तरी इतक्या कमी जागा घेण्यास शिंदे तयार नसल्याचं बोललं जातं. ते आजही आपल्याला १०० जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत. या मागणीसाठी ते दिल्लीला जावून भाजप हायकमांडची भेट घेणार आहेत. या भेटीत ते शिंदेसेनेला जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, शिवाय ते राष्ट्रवादीमुक्त महायुतीसंदर्भातही भाजप हायकमांडशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे एकीकडे शिंदेंना महायुतीत महत्त्वाचं स्थान दिलं जात असतानाच दुसरीकडे अजित पवारांना मात्र महायुतीतून मायनस करणाचे प्रयत्न सुरु झालेत असं बोललं जातंय. भाजप हायकमांडला शिंदे आवडते, पण दादा नावडते, असल्याची चर्चा आहे. मात्र आता खरंच महायुतीकडून तसे प्रयत्न सुरू झालेत का? भाजप हायकमांडला अजित पवार नावडते का ठरतायत, पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке