हरबरा/चना चे टॉप 5 वाण | Top 5 seeds of chickpea | Harbara variety | Chana seeds

Описание к видео हरबरा/चना चे टॉप 5 वाण | Top 5 seeds of chickpea | Harbara variety | Chana seeds

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

====================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

आजचा विषय - 🌱हरबरा/चना चे टॉप 5 वाण | Top 5 seeds of chickpea | Harbara variety | Chana seeds👍

✅देशी वाण -

1. दिग्विजय -
उत्पादन क्विंटल / एकर - ७ -८
पिकाचा कालावधी - ११०
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक, करपा, उष्णता, अस्कोकाईटा ब्लाइट व कमी पाणी सहनशील

2. विजय (फुले जी ८१-१-१) -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू ८ आणि बागायती - १६
पिकाचा कालावधी - १०५ - ११०
वैशिष्ट्ये - पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता, मर रोगास प्रतिकारक्षम, हा वान बुटका तसेच पसरट असून पाने, घाटे व दाणे आकाराने मध्यम आहे

3. विशाल -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू ७ आणि बागायती - १५
पिकाचा कालावधी - ११० - ११५
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, पिवळ्या रंगाचे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षम, निमपसरट व पाने, घाटे आकाराने मोठे तसेच गर्द हिरवे असतात

4. जाकी 9218 -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू ७ आणि बागायती - १४ - १५
पिकाचा कालावधी - ११५ - १२०
वैशिष्ट्ये - झाडे अर्धवट पसरलेली, टपोरे दाने आणि पिवळसर तांबूस रंगामुळे चांगला बाजारभाव या वानाला मिळतो. मर रोगास प्रतीकारक्षम. कोरडवाहू/बागायती दोन्ही प्रकारच्या जमीनीत पेरणी करता येते आणि भरपूर उत्पादन मिळते.

5. आयसीसीव्ही-१० -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू ७ आणि बागायती - १३
पिकाचा कालावधी - ११० - ११५
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता

6. साकी 9516 -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू ६ आणि बागायती - १२
पिकाचा कालावधी - १०५-११०
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, दाणे आकाराने मध्यम

7. राजस -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू ८ आणि बागायती - १६
पिकाचा कालावधी - १०० - १०५
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, पिवळसर तांबूस आणि टपोरे दाणे, उशिरा पेरणीसाठी योग्य

✅कबुली वाण -

1. आयसीसीव्ही-२ -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू ४ आणि बागायती - ८
पिकाचा कालावधी - ९० - १००
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्‍या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव, बोट्रीटिस ग्रे मोल्ड प्रतिकारक्षम

2. पीकेव्ही काबुली-२ -
उत्पादन क्विंटल / एकर - ११
पिकाचा कालावधी - ११० - ११९
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्‍या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव

3. पीकेव्ही काबुली-४
उत्पादन क्विंटल / एकर - ७ - ८
पिकाचा कालावधी - ११० - १२०
वैशिष्ट्ये - कोरडे रूट सडणे बोट्रीटीस राखाडी बुरशीजन्य रोग आणि वाळवण्यास सहनशील, सिंचनासाठी अनुकूल परिस्थिती, विस्तृत पाने असलेले अर्ध पसरणारे, जास्त मोठे पांढरे बियाणे.

✅बियाण्याचे प्रमाण -
👉हरभरा वाणांच्या लहान दाण्यांचा वाणाकरिता (उदा. विजय, विशाल, दिग्विजय,आयसीसीव्ही-10, राजस, साकी 9516) : 20-25 किलो प्रति एकरी.
👉मध्यम आकारमानाच्या वाणाकरिता (उदा. जाकी 9218) : 30-32 किलो प्रति एकरी या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
👉काबुली वाणांमध्ये आयसीसीव्ही-2, पीकेव्ही काबुली-2 व पीकेव्ही काबुली-4 : 40 ते 50 किलो प्रतिएकरी या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.

✅पेरणीची वेळ - कोरडवाहू - 20 ऑक्टोबर - 15 नोव्हेंबर अगोदर (फुल अवस्थेत पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही)
बागायती - 15 नोव्हेंबर (Show bold text on screen)

✅पेरणी पद्धती - देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर 30 सें.मी., तर दोन झाडातील अंतर 10 सें.मी. ठेवावे.
काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन झाडातील अंतर 10 सें.मी. ठेवावे

✅बीज प्रक्रिया -
1. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हीरीडी 5 मिली किंवा कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम चोळावे.
2. यानंतर 50 ग्रॅम NPK जिवाणू प्रति दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणात मिसळून चोळावे.
3. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии

Информация по комментариям в разработке