अद्रक पिकामधील कंद कुज समस्या प्रादुर्भव व व्यवस्थापन I

Описание к видео अद्रक पिकामधील कंद कुज समस्या प्रादुर्भव व व्यवस्थापन I

#अद्रक पिकामध्ये सॉफ्ट रॉट किंवा राइझोम रॉटचे व्यवस्थापन

कारक जीव : पिथियम स्पेसीज बियाणे आणि जमिनीच्या माध्यमातून संक्रमण.
अनुकूल तापमान : 26 ते 30 अंश से. पाणी साचणे किंवा पाण्याचा निचरा चांगला नसल्यास.

लक्षणे :
संक्रमण स्यूडोस्टेमच्या कॉलर भागापासून सुरू होते, वर आणि खालच्या दोन्ही दिशेने वाढते आणि प्रभावित झालेली स्यूडोस्टेम ओलसर दिसते आणि सडते , राइझोममध्ये पसरते ह्याला (मऊ) सॉफ्ट रॉट म्हणून आणि नंतर मुळांमध्ये पसरल्यावर रूट रॉट (कंद्कुज) म्हणून ओळखला जातो. पानाची मधली शिर हिरवी दिसते आणि लॅमिना भाजल्यासारखा दिसतो .नंतर पाने कोमेजणे सुरू होते आणि त्यामुळे पानांवर दुय्यम बुरशीजन्य संसर्ग आणि कुजण्याची क्रिया होऊ शकते .

व्यवस्थापन:
1. पीक चक्रामध्ये (क्रॉप रोटेशन) तृणधान्य पिकांचा समावेश करा .व पिकांची योग्य फेरपालट करा.
2. योग्य निचऱ्याची खात्री करावी. आणि शेतात पाणी साचू देऊ नये.
3. शेतात स्वच्छता राखणे.
4. शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करा तसेच वेळेवर तण काढण्याची व्यवस्था करा.
5. पेरणीपूर्वी 1 तासासाठी मेटालॅक्सिल किंवा मॅनकोझेब @ 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याप्रमाणे बियाणे (राईझोम) बुडवून बीजप्रक्रिया करा. वैकल्पिकरित्या ट्रायकोडर्मा @ 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे 30 मिनिटे बीजप्रक्रिया करु शकता.
6. ट्रायकोडर्मा, स्यूडोमोनास आणि बॅसिलस हे जैविक बुरशीनाशके प्रत्येकी 1 लिटर प्रति एकर प्रमाणे वापरून मातीची प्रक्रिया लागवडी पूर्व करावी .
7. रुटान्झा ग्रॅनुलर (मायकोरायझा) बेडमध्ये 4 किलो प्रति एकर प्रमाणे द्या आणि ऑरिजिनो @ 1 ते 2 टन प्रति एकर प्रमाणे वापरा.
8. संतुलित खते द्या आणि नत्राचा जास्त डोस देण्याचे टाळा. कॅल्मिनोची 1 ग्रॅम / लिटर प्रमाणे फवारणी करा. Ca सप्लिमेंट रिलीज कॅल्शियमची ही @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करता येईल.
9. मोलार @ 10 किलो किंवा मिंगल @ 2 किलो प्रति एकर ह्या प्रमाणे लागवड करताना सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भागवण्यासाठी वापर करा.
10. गरजेनुसार Agriplex-OA वापरून PH 7 पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
11. शिफारस केलेली खते व अन्न द्रवे अनुक्रमे 25%, 70% आणि 5% ह्या प्रमाणत मातीतून , फर्टिगेशन द्वारे आणि पानांवरील फवारणीद्वारे द्या.
12. पिकावर रोगाची काही लक्षणे दिसल्यास लगेच कॉपर ऑक्सिक्लोराईड @ 3 ग्रॅम आणि संचार 40 @ 4 मिली प्रति लिटर या प्रमाणात ड्रेंचींग करा आणि रिलीज कॉपर चिलेट @ 0.25 ग्रॅम किंवा रिडोमिल एमझेड @ 3 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब @ 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम @ १ ग्रॅम + संचार ४० @ २.५ मिली + ओर्सिल @ ०.२५ मिली प्रति लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करा.
13. जर शेतकऱ्याने माती आणि पाण्याचे विश्लेषण केले असेल तर उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी योग्य व अनुरूप खत व पोषण वेळापत्रक तयार केले जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9822650661 / 7588015491

#ginger #agriculture #agrisearch #सॉफ्टरॉट #agriplex-oa #softrot #राइझोमरॉट

Комментарии

Информация по комментариям в разработке