Single women farmer Maharashtra : एकल शेतकरी महिलेचा कोलमडलेलं घर सावरतानाचा संघर्ष...

Описание к видео Single women farmer Maharashtra : एकल शेतकरी महिलेचा कोलमडलेलं घर सावरतानाचा संघर्ष...

#bbcmarathi #farmer #womenfarmer #yavatmal #maharashtrafarmer
यवतमाळच्या शेतकरी कुटुंबातील पुष्पा काकडे यांच्या पतीचं कोव्हिडमध्ये निधन झालं. त्यानंतर दोन मुली, एक मुलगा, सात एकर शेत आणि घराची संपूर्ण जबाबदारी पुष्पा यांच्यावर आली. पतीच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षात त्यांनी कसंबसं स्वत:ला सावरलं. त्यांना शेतीची माहिती होती पण कधी प्रत्यक्षात त्यांनी शेती केली नव्हती. त्यांनी सुरुवात केली पण शेतीतल्या संकटांनी त्यांची पाठ सोडली नाही. हाताशी आलेलं पिकही निसर्गाने हिरावून घेतलं. पुष्पा यांच्यासारखंच एकटीने घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या एकल महिलांची संख्या यवतमाळमध्ये जास्त आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात एकट्या अमरावती विभागात तब्बल 951 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात 246, अमरावतीत 268, तर बुलढाणा जिल्ह्यात 237 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке