खरंच..! फक्त दोन एकरात 35 लाखांचे डाळिंब | Agro Master Balraj Bhosale | Pomogranate Farming Marathi

Описание к видео खरंच..! फक्त दोन एकरात 35 लाखांचे डाळिंब | Agro Master Balraj Bhosale | Pomogranate Farming Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याच्या आनंदपूर या छोट्याशा गावात. महाराष्ट्रातील हा भाग अतिशय श्रीमंत मानला जातो. कारण या ठिकाणच्या डाळिंब, द्राक्ष आणि कांद्याला बाजारात नेहमीच चढता दर असतो. या ठिकाणी आपण फळबागांचे डॉक्टर श्री. बलराज भोसले यांना भेटणार आहोत. होय, फळबागांचे डॉक्टर. श्री. भोसले हे फळबागांचे नियोजन, न्यूट्रिशन, औषध फवारणीबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करतात. आनंदपूरच्या भामरे बंधूंनी एग्रो मास्टर श्री. भाेसले यांच्या नियोजनानुसार फळबाग फुलविली. त्यामुळे कधी काळी बाग मोडून टाकलेल्या या शेतकऱ्यांना फक्त दोन एकरात ३५ लाखांचे लाल सोने म्हणजेच डाळिंबाचे उत्पन्न घेणे शक्य झाले. शेतीतून खात्रीशीर पैसा कमावण्यासाठी आज अनेक जण एग्रो कन्सल्टंटकडे धाव घेत आहेत. तर, आजच्या व्हिडिओत आपण याच विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

#dalimbsheti
#agromaster
#balrajbhosale
#pomegranatefarming
#shivarnews24
#satana
#btbhosaleagroconsultancy

Комментарии

Информация по комментариям в разработке