महाभारताची महानायिका - द्रौपदी (A Lecture by Dr. Gauri Moghe)

Описание к видео महाभारताची महानायिका - द्रौपदी (A Lecture by Dr. Gauri Moghe)

Draupadi is one of defining figures in the epic of the Mahabharata. And yet, there is little known about her beyond her insults and their avenge, her pious fury, and her dedication to Pandavas. This talk is thus an earnest attempt to shed light on some intricate facets of the personality of Draupadi. This lecture is delivered by Dr. Gauri Moghe.

--

महाभारताची महानायिका, अर्थात्, द्रौपदी 

महाभारतातील कौरव-पांडवांची कथा प्रधान मानली तर ह्या मुख्य कथेच्या विविध घटनांना जोडून त्यांची एक शृंखला करणारी व्यक्तिरेखा म्हणजे द्रौपदी. आणि म्हणूनच ती महाभारताची ‘महानायिका’ आहे. द्रौपदी विषयी अनेक कथा, प्रसंग प्रचलित आहेत जे आपण वर्षानुवर्षे ऐकत आहोत. पण ह्या सर्व प्रसंगांचे महाभारताच्या मूळ ग्रंथामध्ये संदर्भ कसे आहेत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. प्रस्तुत व्याख्यानामध्ये आपण महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीतील संदर्भांच्या आधारे द्रौपदीच्या व्यक्तिरेखेचे विविध आयाम पाहणार आहोत. तसेच महाभारताच्या मुख्य कथानाकातील असणारे द्रौपदीचे महत्त्व, व्यक्ती म्हणून तिचे स्वतंत्र अस्तित्व आणि महाभारतासारख्या धर्मशास्त्र सांगणा-या कथेमध्ये वारंवार पणाला लागणारे द्रौपदीचे सत्त्व, यांसारख्या विविध पैलूंचा विचार प्रस्तुत व्याख्यानामध्ये करण्यात येईल.

Комментарии

Информация по комментариям в разработке