अष्टगंधा झेंडू लागवड यशोगाथा २०१९ | Marigold Ashtgandha | Bhagva zendu | Indus seeds | zendu Lagvad

Описание к видео अष्टगंधा झेंडू लागवड यशोगाथा २०१९ | Marigold Ashtgandha | Bhagva zendu | Indus seeds | zendu Lagvad

झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.

जमीन व हवामान

झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेन्दुपासून मिळते.

झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेन्दुसाठी सुपीक, पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. ज्या जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगले येते. झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत.

पीक संरक्षण

झेंडू या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नाग अळी, अळी, कटवर्म या किडींचा व करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

हे लक्षात ठेवा

बाजारपेठेत सतत फुलांचा पुरवठा होण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने लागवड करा.

रोपे तयार करतांना जास्त काळजी घ्या. सुदृढ रोपांचीच लागवडीसाठी निवड करा.

ज्या जमिनीत सुतकृमींचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या ठिकाणी झेंडूची लागवड करा.

पाणथळ जमिनीत झेंडूची लागवड करू नका.

  *#अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रमोद सुरवसे पंढरपूर मोबाईल नंबर - 80 87 535 999

Комментарии

Информация по комментариям в разработке