काळू-बाळू लोकनाट्य तमाशा, कवलापूर : 'जहरी प्याला'(वगनाट्य) - हास्याचा पाऊस ( भाग १ )

Описание к видео काळू-बाळू लोकनाट्य तमाशा, कवलापूर : 'जहरी प्याला'(वगनाट्य) - हास्याचा पाऊस ( भाग १ )

#Palus #kavalapur #kalubalu
काळू-बाळू लोकनाट्य तमाशा (जहरी प्याला)
महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत सांगली जिल्ह्यातील कोल्हापूरकरांच्या तिसऱ्या पिढीतील 'काळू - बाळू लोकनाट्य तमाशा' हा 'तुरा' पक्षाचा तमाशा फड जवळजवळ दीडशे वर्षे लोकरंजन करीत आला आहे.
एकोणिसाव्या शतकाकात सातू- हिरू कवलापूरकर, त्यानंतर दुसऱ्या पिढीत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवा- संभा कवलापूरकर आणि भाऊ फक्कड यांनी ही तमाशाची परंपरा चालू ठेवत लोकरंजन आणि प्रबोधनाचे मोठे काम केले. सन १९१९ राजर्षि शाहू महाराज यांनी गौरवलेला शिवा - संभा यांचा तमाशा फड महाराष्ट्र नावलौकिक मिळवून गेला. यावेळी भाऊ फक्कड यांनी लिहिलेल्या रचना शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीसाठी उपयोगात आणल्या. नाट्य, अभिनय आणि गायन याद्वारे आपली स्वतःची एक नवीन शैली निर्माण करणारा हा कवलापूरकरांचा 'लोकनाट्य तमाशा ' आजही पाचव्या पिढीत सुरू आहे.
सन १९५० सालापासून २००१ पर्यंत ५१ वर्षात लहू-अंकुश ही संभाजी खाडे यांची आवळी-जावळी मुले बाबुराव पुणेकर लिखित 'जहरी प्याला' या वगामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या वगातील त्यांच्या काळू- बाळू या भूमिकेने तमाशा इतिहासात उच्चांक केला. त्यांचे दोघांचे एकाच स्वरात द्विअर्थी बोलणे रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले. विशेष म्हणजे या वगातील काळू-बाळू दरबारातील शिपाई (हवलदार) आणि भिमराव खाडे यांची करड्या आवाजातील सेनापतीची भूमिका या इतक्या गाजल्या की त्याचे हजारो प्रयोग झाले. तेंव्हापासून कोल्हापूरकरांच्या लोकनाट्य तमाशाला 'काळू बाळू लोकनाट्य तमाशा' हेच नाव रूढ झाले. त्यांचे इतर वगही गाजले पण 'जहरी प्याला' या वगाचे खूप कौतुक झाले. या वगासाठी सुरवातीपासून रामचंद्र खाडे, शामराव खाडे, भीमराव खाडे व स्वतः लव- अंकुश खाडे, घनश्याम खाडे व इतर त्यांची मुले या कुटुंबातील सदस्यांनी खूप योगदान दिले. त्यामुळे कवलापूरकरांचे नाव तमाशा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
आता हे'जहरी प्याला' वगनाट्य तमाशावर प्रेम करणारे एक रसिक सुरेश पाटील आणि वसंत पाटील यांच्याकडून मला उपलब्ध झाले आहे. इथे स्वतः लव - अंकुश खाडे (काळू-बाळू) सेनापतीच्या भूमिकेतील भीमराव खाडे, संपत खाडे व अरूण खाडे हे आपणास पाहावयास मिळतील. काळू-बाळू यांचा तमाशातील सेवानिवृत्तीपूर्वी १९९५ साली याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. तेव्हा रसिकतेने या वगाचा आनंद घ्यावा ही विनंती.
कृपया हा वग दुर्मिळ असून आपण सर्वांनी या कलाकारांचा सन्मान राखून या वगाचा आनंद घ्यावा. आपणा सर्वांना पाहण्यासाठी हा वग अपलोड केला आहे. आपण कुणीही तो डाऊनलोड करू नये अथवा त्याचा गैरवापर करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व हक्क 'लोकरंजन' या युट्यूब चँनेलकडे अबाधित.
डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस.
९६२३२४१९२३
....


Follow on This Media -

● Telegram -
https://t.me/Lokranjandrsampatparlekar

● Facebook -   / sampatrao.parlekar.77  

Комментарии

Информация по комментариям в разработке