आळंदी दर्शन संपूर्ण | Alandi Darshan 2024 | Alandi | संत ज्ञानेश्वर महाराज | पाऊलवाटा |

Описание к видео आळंदी दर्शन संपूर्ण | Alandi Darshan 2024 | Alandi | संत ज्ञानेश्वर महाराज | पाऊलवाटा |

आळंदी...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत, संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. ही देवाची पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे.
आळंदी घाट आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७०(की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे. त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात. संत ज्ञानेश्वरानी भगवद्गीता हा ग्रंथ मराठीत आणला.

हैबतबाबा पायरी : –
हैबतबाबा हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे फ़ार मोठे भक्त. पंढरपूर येथे जशी नामदेवांची पायरी तशी आळंदी येथे हैबतबाबांची पायरी. त्यांचे वंशज आजही पालखी सोहळा चालवतात.

श्री सिद्धेश्वर : –
हे शिवलिंग फ़ार प्राचीन आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुर्वी आळंदी प्रसिध्द होती ती सिद्धेश्वरामुळे. श्री ज्ञानेश्वरांचे हे कुलदैवत आहे.

अजानवृक्ष : –
हा वृक्ष पवित्र समजला जातो. या वृक्षाची छाया दॆऊळवाड्यात शतकानुशतके पडली आहॆ. याची मुळी समाधीस्थानात श्री ज्ञानदेवांच्या कंठास लागली आणि श्री एकनाथ महाराजांना दृष्टांत होऊन त्यांनी ती दूर केली अशी आख्यायिका आहे. येथे भाविक श्री ज्ञानेश्वरीची अखंड पारायणे करतात.

सुवर्ण पिंपळ : –
सुवर्ण पिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फ़ार पुरातनकाळापासून उभा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे भाग्य या वृक्षामुळे उदयाला आले आणि जगाला चार सोन्यासारखी मुले मिळाली.

श्री एकनाथ पार : –
श्री ज्ञानेश्वरांच्या मंदिरात असलेल्या श्री केसरीनाथ मंदिरासमोरचा हा एकनाथ पार फार जुना होता. १९७६ साली चिंचवडचे ज्ञानेश्वर भक्त श्री. जगन्नाथ गणपती गावडे यांनी स्वखर्चाने पुन्हा बांधून संस्थानला अर्पण केला. या पारावर नाथांच्या पादुका बसविण्यात आल्या आहेत.

पुंडलिकांचे देऊळ : –
पुंडलिकांचे देऊळ पुण्यातील एक सावकार चिंतामण विठ्ठल माळ्वतकर यांनी १८५७ साली बांधले. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या पात्रात आहे.

विश्रांतवड : –
श्री ज्ञानेश्वर- चांगदेव भेटीची साक्ष.
वडगांव-घेनंद रस्त्यावर या भेटीची साक्ष विश्रांतवड आजही देत आहे. चांगदेवांचे असंख्य शिष्य विंचवाचे रुपाने, अश्विन महिन्यात नवरात्र उत्सवाचे वेळी श्री ज्ञानदेवांची पालखी तेथे जाते त्यावेळी प्रगट होतात. पण वैशिष्ट्य म्हणजे कोणासही दंश करत नाहीत अशी भाविकांची श्रदधा आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेली भिंत:
चांगदेव वाघावर बसून आले. हातात सर्पाचा चाबूक होता. त्यांचा गर्वपरिहार करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्याची भावंडे या भिंतीवर बसून त्यांना सामोरे गेले व त्यांना उपदेश केला.
साभार

these things covered in this video :-
alandi darshan online
alandi darshan live
alandi darshan pune
alandi darshan video
alandi live darshan 2024
alandi kalash darshan
vitthal darshan alandi
alandi devachi live darshan
alandi shikshan sanstha
INDRAYANI RIVER
indrayani river history
indrayani nadi ugam sthan
indrayani nadi information in marathi
indrayani nadi chi mahiti
indrayani ghat alandi
AJANBAG AJANVRUKSHA
DNYANESHAR MAULINI CHALVLELI BHINT
suvarn pimpal alandi
Sant Dnyaneshwar Samadhi Temple & Indrayani River
flaying wall alandi
alandi yatra 2024
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 status
alandi he gaon punyabhumi thav abhang
viswashanti sthambh alandi
alandi yatra 2024
aalandi yatra 2024
sanjivani samadhi sohala alandi 2024
alandi yatra
kartik ekadashi alandi
kartik yatra alandi 2024
alandi yatra 2024
#alandi
#आळंदी_दर्शन
#संत_ज्ञानेश्वर_महाराज
#paulvat
#paulwata
#पाऊलवाटा
#पाऊलवाट

Комментарии

Информация по комментариям в разработке