Dr Varada Godbole @ LKSS.22

Описание к видео Dr Varada Godbole @ LKSS.22

रसिकांनी एकत्र येऊन संगीत ऐकण्याला गेल्या २ वर्षात संगीत रसिक पारखे झाले होते. या पार्श्वभूमीवर ३ दिवस लोणावळ्यामध्ये निवास करून कलाकार आणि संगीत रसिक एकत्र येतात आणि संगीताचा आनंद मनमुराद घेतात ही मानसिक समाधान देणारी बाब होती हे खरेच, शिवाय कोणत्याही इतर व्यवधानांचा विचार न करता फक्त संगीतावरच लक्ष केंद्रित करून त्या कलेचा आनंद लुटणे हे केवळ निवासी संगीतामुळे शक्य झाले. २५-२६-२७ मार्च २०२२ रोजी मनःशक्ती केंद्र, लोणावळा येथे संपन्न झालेल्या संमेलनाचा

डॉ. वरदा गोडबोले यांच्या गायनाने महोत्सवाची सुरेल सांगता झाली. वरदा यांनी देसी रागामध्ये रातंजनकर यांनी लिहिलेला रचना ‘प्रिया मम वारी’ विलंबित तीनतालामध्ये गायली. लोणावळा महोत्सवामध्ये अनेकवेळा ऐकले जाणारे, प्रचलित रागापेक्षा अनेक अनवट राग ऐकायला मिळाले, हे विशेष. उस्ताद बडे गुलाम अली खां यांची "मनवा लरजे मोरा" ही बंदिश रसिकप्रिय आहे. वरदा यांनी देसी रागामध्ये बोल-आलापी करताना रागाचे सौंदर्य उलगडलेच शिवाय त्या रागामधील भावदर्शनही उत्तमरीत्या केले. आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा सुरेल संगम त्यांच्या गायनामध्ये दिसला. रातंजनकर यांनी लिहिलेली "हटो हटो जाओ छांडो" ही मध्यलय एकतालातील बंदिश सादर करताना वरदा गोडबोले यांनी लयकारी, मिंडयुक्त बेहलाव, बोलबात बोलबनाव अशा आग्रा घराण्याच्या गायकीमधील वैशिष्ट्यांचा सुयोग्य वापर केला.

रविवार दुपारचे टळटळीत ऊन बाहेर पडले आहे, अशा वातावरणात वरदा यांनी शुद्ध सारंग रागामध्ये रातंजनकर यांची आद्धा तीनतालातील रचना स्वप्नील भिसे आणि अजय जोगळेकर यांच्या साथीने सादर केली.
‘गगन चढी आयो भानू दुपहारे तपत भयी तन मन की अती भारी
कादंब की छैया ठाडे कन्हैया शुद्ध नाम सारंग बिराजत नाद रूप दोऊ ताप हारी’
एकतालामधील पं. यशवंत महाले रचित तराना सादर केल्यानंतर वरदा गोडबोले यांनी "अब ना मारो फुल गेंदवा" या भैरवीने महोत्सवाची सांगता केली. महोत्सवाचा शेवट ‘वलयांकीत’ कलाकाराच्या सादरीकरणाने करण्याऐवजी दर्जेदार कलाकाराची निवड करण्याचे धाडसी पाउल उचलल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक.

Комментарии

Информация по комментариям в разработке