गोखिवरे गावचा दहीकाला उत्सव २०२४ | GOKHIVARE GAVCHA DAHIKALA UTSAV 2024

Описание к видео गोखिवरे गावचा दहीकाला उत्सव २०२४ | GOKHIVARE GAVCHA DAHIKALA UTSAV 2024

कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि दहीहंडीचा सण श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. दहीहंडी हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे, त्यामुळे हा उत्सव यंदा मंगळवार , २७ ऑगस्ट रोजी साजरा केला. दहीहंडीच्या परंपरेत, भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आठवणी समोर ठेवल्या जातात. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळकाला असेही म्हणतात.

कृष्णाचा जन्म अनेक उद्देशांनी झाला होता. त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी ही देखील त्यांची एक लीला आहे.

दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो.

आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता की गेल्या ३१ वर्षांपासून गोखिवरे येथील पारंपरिक दहीहंडी हा उत्सव सर्व ग्रामस्थ मिळून मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात. आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपावी, आपल्यात एकोपा निर्माण व्हावा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

या उत्सवातून सहकार्य आणि सहकार्याला प्रोत्साहन मिळते. मानवी मनोरा निर्मिती कार्य सर्व सदस्यांना सामंजस्याने आणि परस्पर विश्वासाने एकत्र काम करण्याची मागणी करते. जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता, उत्सव समुदायाची भावना वाढवतो आणि लोकांना एकत्र करतो.

यंदा देखील २७ ऑगस्ट रोजी गोखिवरे गावातील दहीहंडी मिरवणूक काढण्यात आली होती तेव्हा आपली परंपरा जपावी म्हणून विविध वेशभूषा करून मिरवणूक काढण्यात आली. हंडी फोडताना गोपळांमध्ये असलेला उत्साह हा नेहमी पेक्षा जास्तच दिसून येत होता. देवळात आरती होऊन मिरवणूक निघाली, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

गावातील प्रत्येक घरात समोरून ही मिरवणूक निघते जेव्हा भगवान श्री कृष्ण आणि राधा हे आपल्या दारात आलेलं बघून गावातील महिला त्यांचं औक्षण करतात. प्रत्येक जण आपल्या लहान मुलांना विविध वेशभूषेत असलेले राक्षस, जोकर यांना दाखवत असतात.

दहीहंडी फोडताना जेव्हा गोविंदा पथक उंच मानवी मनोरा रचतो तेव्हा तो उंच उंच दिसणारा मानवी मनोरा बघून प्रेक्षकांची बोटे अगदी तोंडात जातात. बघताना मनात होणारी धग धग, बघ्यांची गर्दी हा सर्व अनुभव वेगळाच आनंद देऊन जातो. ह्यावेळी गोविंदाच्या मिरवणुकीत गावातील महिलांची उपस्थितीहि लक्षणीय होती हे विशेष.

आयोजक
मा.अजित दादा वैती
(संस्थापक / अध्यक्ष )
धर्मवीर मित्र मंडळ

सदर मिरवणुकीस विविध वेशभूषेत असलेले
गणपती ( शुभम गोसावी )
भगवान श्री.कृष्ण ( प्रेम सोनावणे )
राधा ( दिशा चावडा )
हनुमान ( अंकित कांबळे )
राक्षस ( आकाश मासाळ )
टेडी ( हर्षद येडगे आणि अनुज वैती )
जोकर (सुनील अडसूळ आणि दीपक (फरफर्या) )

प्रमुख उपस्थिती
मा.अजित दादा वैती
जितेंद्र पाटील
शैलेंद्र गोलवणकर
नितीन वैती
राकेश वैती
कैलास तरे
किरण वैती
शेखर जोशी
राजेश पाटील
किशोर पाटील
भूषण अजित वैती
प्रवीण प्रकाश गावडे
शेखर कारले
सागर धडस
प्रतिक वैती
तुषार प्रधान
कल्पेश ,
स्वप्नील शिंदे
यश सुसलादे
आकाश घोरपडे

: विशेष आभार :

श्री. प्रवीण भोईर ( मा.नगरसेवक )
सर्व गोखिवरे ग्रामस्थ, महिलामंडळ आणि पदाधिकारी
सचिन दत्तात्रय गुरव (पुजारी)
सिद्धिविनायक गोविंदा पथक , गोखिवरे
त्रिमूर्ती कला केंद्र (अतुल )
उमेळमान ब्यान्जो पथक

चित्रीकरण आणि संकलन
प्रतिक अ. वैती


SHOOT ON SAMSUNG S 20 FE .

Комментарии

Информация по комментариям в разработке