Walmik Karad च्या अटकेनंतर आता Sudarshan Ghule ला लवकरचं अटक होणार ? घुले नक्की आहे कोण ?

Описание к видео Walmik Karad च्या अटकेनंतर आता Sudarshan Ghule ला लवकरचं अटक होणार ? घुले नक्की आहे कोण ?

#bolbhidu #WalmikKarad #SudarshanGhule

३१ डिसेंबरला वाल्मिक कराड पुणे CID समोर शरण आला आणि केज न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याचा निर्णय घेतला. शरण येण्याआधी वाल्मीक कराडने व्हिडिओ पोस्ट करत मला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात फसवलेलं असुन मी स्वत: पोलिसांना शरण येत असल्याचं सांगितलं. आता वाल्मीक कराड जरी शरण आला असला तरी आणखीन एक प्रश्न उरतो, तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य तीन आरोपी अजून फरार आहेत. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अशी या तीन आरोपींची नावे आहेत. यात वाल्मीक कराड याच्यासोबत सुदर्शन घुलेसुद्धा संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं बोललं जातंय.

पण जेव्हापासून वाल्मीक कराड चर्चेत आलेत तेव्हापासून सुदर्शन घुलेच नाव चर्चेतून माग पडलं. फक्त संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी म्हणून त्याच नाव बातमीत राहिलं. बाकी तो कुठला आहे? त्याचा इतिहास काय आहे? त्याची पार्श्वभूमी काय? हे आतापर्यंत कुणालाच माहिती नाही. त्यामुळे सुदर्शन घुलेबद्दल आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणातील इतर आरोपी कोण आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? वकिलांनी वाल्मिक कराडची कोठडी मागताना सुदर्शन घुलेबाबत काय सांगितलं ? सगळी माहिती पाहूयात या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке