भुईकोट किल्ला अहमदनगर | Ahmednagar Fort | Bhuikot killa ahmednagar| Bhuikot Killa I ऐतिहासिक अहमदनगर

Описание к видео भुईकोट किल्ला अहमदनगर | Ahmednagar Fort | Bhuikot killa ahmednagar| Bhuikot Killa I ऐतिहासिक अहमदनगर

भुईकोट किल्ला अहमदनगर | Ahmednagar Fort | Bhuikot killa ahmednagar| Bhuikot Killa I

-------------------

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला.
अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरुवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला
-------------------
https://pixabay.com/users/lexin_music...

Комментарии

Информация по комментариям в разработке