जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड प्रवास वर्णन | Trek to

Описание к видео जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड प्रवास वर्णन | Trek to

सह्याद्रीतील रांगेतील उंच उंच शिखरे, पोटात धडकी भरवणारे खोलकडे, अनेको नद्यांचे उगम स्थान, संरक्षित अभयारण्य, प्राचीन पौराणिक आणि मध्ययुगीन इतिहासाचे किनार, शिल्पसौंदर्यांनी नटलेल्या लेण्या व मंदिरे अशा अनेको अंगा-उपांगांनी हा पर्वत बहरलाय.. त्यामुळेच खऱ्याखुऱ्या भटक्याला या ‘हरिश्चंद्रनामा पर्वतू’कडे धावणाऱ्या वाटा या कायम आषाढी-कार्तिकीच्या वाटतात.
.
हरिश्चंद्रगड..
हा गड केवळ भटक्यांची पंढरी नाही,
हा गड केवळ वर्षा व निसर्ग पर्यटनाचे स्थळही नाही.
हा गड विश्वामित्रांची तपोभूमी
हा गड सत्यवादी राजा हरिश्चंद्राचा विजयगाथा
हा गड समुद्रमंथना मागे दडलेल्या घटनांचा साक्षीदार
हा गड एक नाही दोन नाही तर तब्बल तीन नद्यांचे उगम स्थान
हा गड महाराष्ट्राचे आद्य आणि मातृसत्ताक राजघराणे सातवाहन राजांनी देश आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्रीतील घाटवाटा आणि लेण्यांचा कातळ
हा गड राष्ट्रकूटांनी निर्मित केलेल्या अरण्येश्वर आणि केदारेश्वर शिवालयाचा आहे
हा गड कोकणातील शिलाहार राजा झांज याने निर्मित केलेल्या सप्त तीर्थांचा आहे
हा गड तत्वसाराचे कथन करणाऱ्या चांगदेवांचा आहे
हा गड यादवांनी पुनर्बांधणी केलेल्या हरिश्चंद्रेश्वराच्या आहे
हा गड आजही तारामतीचा मुकुटमणी धारण करून उंच अशा कोकणकड्यावरून रोहिदासाची पाठ राखण करत खडा उभा आहे

#harishchandragad #ahmednagar #ilovenagar #meahmednagarkar #archilogicalsurveyofindia #NagarTrekkers #malshejghat #khireshwar #harishchandragad #mulariver #ahmednagar #अहमदनगर #ahmednagarhistory #ilovenagar #कोकणकडा #kokankada

Комментарии

Информация по комментариям в разработке