कमी पाण्यात भाजीपाला लागवड कशी करावी अग्रोवन भाजीपाला लागवड तंत्रज्ञान भाजीपाला लागवड विषयी माहिती

Описание к видео कमी पाण्यात भाजीपाला लागवड कशी करावी अग्रोवन भाजीपाला लागवड तंत्रज्ञान भाजीपाला लागवड विषयी माहिती

कमी पाण्यात भाजीपाला लागवड कशी करावी अग्रोवन भाजीपाला लागवड तंत्रज्ञान भाजीपाला लागवड विषयी माहिती भाजीपाल्याची लागवड कशी व का केली जाते? त्याची पद्धती कशी? त्यासाठी लागणारे हवामान, माती, पाणी, खते इत्यादी बाबी आणि शेतीचे प्रकार कोणते? असे अनेक प्रश्‍न सामान्य जणांच्या मनात उद्भवत असतात. अशा प्रश्‍नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळाल्यास प्रश्‍नकर्त्यांच्या मनाचे समाधान होते. यासाठी प्रमुख चार बाबी प्रथम विचारात घ्याव्या लागतात. 1. आपल्याकडे शेतीची साधणे कोणकोणती आहेत? 3. आपण धान्य लावणार की भाजीपाला हे ठरवावे. 3. हे शेतीकाम प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याकडे कोणती व्यवस्था / उपलब्धता आहे? 4. शेती केल्यानंतर शेतमाल बाजारपेठेकडे पाठविण्यासाठी व विक्रीसाठी आपण काय करणार आहोत? तशी व्यवस्था आहे की नाही?
वरील चार बाबी महत्त्वाच्या आहेत. शेती वा भाजीपाला पिकवण्यासाठी हे लक्षात घेऊन भाजीपाल्याची शेती दोन प्रकारात येते. 1. आपल्या वैयक्‍तिक गरजेसाठी किचन गार्डनमध्ये पिकवला जाणारा भाजीपाला. 2. रोजगार व कमाईसाठी व्यावसायिक शेती.सेंद्रिय भाजीपाला लागवड
या शिवायही शेतीसंबंधाने अनेक जोडधंदे असतात. त्याचा सखोल विचार करून नियोजनपूर्वक आपण पैसा मिळवू शकतो. अर्थात त्यासाठी बाजारपेठांची/ मंडईची माहिती, भाजीपाल्याचे दर, मालाची साठवणूक करता येण्यासारखी जागा, याकडे लक्ष दिल्यास व तशी व्यवस्था असल्यास आपण पैसा कमावू शकतो. आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या जमिनीचा व इतर बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.#भाजीपाला_लागवड
1.शेततळे, तलाव उपलब्ध असेल तर त्यातही भाजीपाल्याचे पीक आपण घेऊ शकतो.
2. काही जण भाजीपाला न विकता भाजीपाल्यापासून उच्च प्रतीचे बी-बियाणे तयार करून ते पॅकिंग करून बाजारात विक्रीस आणतात.
3. काही जण केवळ आपल्या घराच्या, शेताच्या कुंपणासाठी व खाण्यासाठी भाजीपाला लावतात.
4. योग्य ऋतू/हवामान पाहून बहुतेकजण भाजीपाल्याचे उत्पादन घेतात, पण जे ऋतू नसताना बेमोसमी पीक घेतात ते भरपूर आर्थिक कमाई करतात. #अग्रोवन
किचन गार्डन (गृहवाटिका) मध्ये भाजीपाला पिकवणे
तुमच्या घराच्या अंगणात वा परसदाराशी थोडी जमीन असेल आणि तुम्हाला भाजीपाला पिकवण्याची आवड असेल तर थोड्या कष्टात, आवडीनुसार वेळ देऊन तुम्ही भाजीपाला पिकवू शकता. स्वतः पिकवलेल्या भाजीचे सेवन करताना मनाला आनंद तर मिळतोच, शिवाय आपल्याला स्वास्थ्य लाभही होतो. यामुळे..
अ) कुटुंबाची रोजची भाजीपाल्याची काळजी मिटते.
ब) रोज ताजी भाजी मिळते. अशा भाजीची गुणवत्ता श्रेष्ठ असते. #ॲग्रोवन
क) ताजा भाजीपाला स्वास्थ्यलाभ देतो.
ड) घरातील सर्वांनीच या गृहवाटिकेच्या कार्यात लक्ष घातल्यास विविध प्रकारचा भाजीपाला लावता येईल.
इ) हल्‍ली अनेक परिवार गृहवाटिकेच्या कामात रुची घेऊ लागले आहेत. तसेच अधिकाधिक माहिती जमा करून गृहवाटिकेची उपयुक्‍तता वाढवू लागले आहेत.
फ) फावल्या वेळेत गृहिणी आपल्या किचनगार्डनची काळजी घेताना दिसताहेत. त्यांना घरच्याघरी भाजी पिकवण्याचे कार्य आनंददायी वाटू लागले आहे. काहीजणी त्यातून आर्थिक लाभ घेत आहेत.
किचन गार्डनसाठी जागा ः
घरगुती बागेत , उपलब्ध जागेत, भाजी लावण्याची माहिती सर्वांना आहे, असे गृहीत धरू. मोकळी जागा नसेल तर पत्र्याच्या डब्यात, घमेल्यात, कुंडीत किंवा घराच्या छतावरही भाजीपाल्याची लागवड करता येते.
भरपूर जागा असल्यास ःभाज्यांची लागवड
घराच्या मागे किंवा पुढे, घराच्या डाव्या वा उजव्या बाजूस कोठेही भाजीपाला लावता येतो. भरपूर जागा असेल तर प्रत्येक मोसमात भाजीपाल्याची विविध पिके घेता येतील. त्यामुळे रोज मंडईत जायला नको तसेच आर्थिक बचतही होईल.
परदेशी भाजीपाला लागवड
आपण कोणतेही काम काही ना काही फायद्यासाठी वा उपयोगासाठी करत असतो. फायदा मिळणार नसेल तर कोणीही फुकटचा उद्योग करणार नाही. गृहवाटिकेपासून कोणते फायदे होऊ शकतात याची माहिती पुढीलप्रमाणे.
1. गृहवाटिकेत काम केल्याने शरीराला थोडाफार व्यायाम होतो. हा व्यायाम सार्थकी लागतो. त्यामुळे शरीर स्वस्थ राहते.
2. अशा कामामुळे मनोरंजनही होते आणि आपण लावलेल्या रोपट्यांची कशी वाढ होते याकडे लक्ष लागल्याने मनाला आनंद होतो.
3. हा फावल्या वेळेचा शौक मानायला हरकत नाही. गृहिणी व लहान मोठ्या व्यक्‍तीसुद्धा गृहवाटिकेत काम करण्याचा आनंद घेऊ शकतात. यातून आर्थिक लाभही घेता येतो.
4. हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे तर मेंदूलाही स्वस्थ ठेवण्याचा व मन गुंतवण्याचा उपाय आहे. घरात वा भोवताली हरित वनस्पती असल्यास बुद्धी अधिक प्रभावी होते.
5. घरच्याघरी आनंद देणारे हे काम आहे. यासाठी कपडे बदलण्याची, नटूनथटून कोठे जाण्याची गरज नाही. दिवसातला तास, अर्धा तास या किचन गार्डनसाठी खर्च केलात तरी पुरे.
6. घरातली कोणीही व्यक्‍ती आपल्या आवडी व सवडीनुसार हे काम करू शकते.
7. ज्याला वनस्पतीच्या रोपट्यांची व मातीकामाची आवड आहे त्याला हे काम चांगले करता येते.
8. घरच्याघरी पिकवलेली भाजी स्वतः काढून वापरण्यात जो आनंद आहे, त्याला सीमा नाही.
9. आपल्या किचन गार्डनची भाजी भरपूर, पौष्टिक स्वादपूर्ण आणि गुणवत्तेत अग्रणी असते.
10. शाळेला जाणार्‍या मुलांनी जर किचन गार्डनमध्ये लक्ष घातले तर त्यांची सर्जनशक्‍ती वाढते. निसर्गाच्या जवळ जाण्याचा व निसर्ग समजून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
11. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या पत्रिकेतील बुध अनिष्ट आहे अशा व्यक्‍तींनी रोपट्यांना दररोज पाणी द्यावे म्हणजे बुध सौम्य होतो व बुद्धी वाढते. उन्हाळी भाजीपाला लागवड

Комментарии

Информация по комментариям в разработке