यंदाही आले लागवड जोमात | अद्रकला नऊ हजार रुपये क्विंटल भाव | Ginger Cultivation | महाराष्ट्र शेतकरी
यंदा मान्सूनचे वेळेमध्ये आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्ग खुश असून सध्या पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे. दरवर्षी काही भागांमध्ये अद्रक म्हणजेच आले लागवड मोठ्या प्रमाणात होते. दोन वर्षांपूर्वी अद्रकला प्रति क्विंटल दहा ते पंधरा हजार रुपयांचा भाव मिळाला होता. गेल्या वर्षी आले 9 ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकले गेले. त्यामुळे यंदा सुद्धा मोठ्या क्षेत्रावर अद्रक लागवड सुरू आहे.
अद्रक लागवड : एकरी उत्पन्न 100 ते 150 क्विंटल
आले लागवड करण्याची लगबग सध्या शेतकरी वर्गामध्ये दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी परिसरामध्ये अद्रक लागवड जोमाने सुरू आहे. एका एकरमध्ये सरासरी 100 ते 150 क्विंटल अद्रकचे उत्पन्न होते. अद्रक लागवड करण्यासाठी सरासरी एकरी खर्च दीड लाखाच्या आसपास आहे परंतु चांगला भाव सापडल्यास एका एकरमध्ये चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळते.
आले लागवड : एकरी दीड लाखांचा खर्च
अद्रक मार्केट आणि अद्रक लागवडीचा अभ्यास करून शेतकरीवर्ग कमी जागेमध्ये चांगला पैसा कमावू शकतो. यावर्षी सुद्धा अद्रकला जवळपास चार ते पाच हजार रुपये भाव असला तरी शेतकऱ्यांना परवडते. कारण एका एकरमध्ये सरासरी 100 क्विंटल अद्रक झाली आणि पाच हजार रुपये सरासरी भाव मिळाला तरी पाच लाखाचे उत्पन्न होते. दीड लाखाचा मशागत खर्च वगळता एका एकरामध्ये साडेतीन लाख रुपये नफा मिळू शकतो. परंतु यावर्षी आल्याचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे भाव किती राहील याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. तरीही अनुभवी शेतकरी आले लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
आले लागवड, अद्रक लागवड, आले मार्केट, अद्रक लागवड संपूर्ण माहिती, अद्रक बाजारभाव, अद्रक एकरी खर्च, आले एकरी उत्पन्न, सुरत अद्रक मार्केट आले, अद्रक मार्केट सुरत, आजचे बाजार भाव अद्रक, आले लागवड माहिती, आले पीक रोग, आले पीक औषधी, अद्रक खत, आले पीक व्यवस्थापन, अद्रक औषध फवारणी,
This year the farmers are happy with the timely arrival of monsoon and now the sowing work has picked up pace. Every year, ginger is grown in large numbers in some areas. Two years ago, ginger fetched Rs 10,000 to 15,000 per quintal. Last year, ginger was sold at Rs 9,000 to 10,000 per quintal. Therefore, this year too, ginger is being cultivated on a large area. The interest in cultivating ginger is currently being seen among the farmers. Ginger cultivation is going on vigorously in the eggplant area of Sillod taluka of Chhatrapati Sambhajinagar district. An acre yields an average of 100 to 150 quintals of ginger. The average cost per acre for ginger cultivation is around one and a half lakhs, but if a good price is found, an acre yields four to five lakhs. Farmers can earn good money in less space by studying ginger market and ginger cultivation. Even this year, ginger is priced at around Rs 4,000 to 5,000 but the farmers can afford it. Because an average of 100 quintals of ginger is grown in one acre and even if the average price is five thousand rupees, the income is five lakhs. One acre can get a profit of three and a half lakh rupees, excluding the cultivation cost of one and a half lakh. But this year the area of ginger has increased. Therefore, there is fear in the minds of farmers about how much the price will be. Still experienced farmers are cultivating ginger on a large scale.
Ginger Cultivation, Ginger Cultivation Complete Information, Ginger Market Price, Ginger Acre Cost, Ginger Acre Income, Surat Ginger Market Ginger, Ginger Market Surat, Today's Market Price Ginger, Ginger Cultivation Information, Ginger Crop Disease, Ginger Crop Medicine , Ginger Fertilizer, Ginger Crop Management, Ginger Spray,
#aalelagwad
#adrakpikl
#ginger
#gingermarket
#gingercultivation
#अद्रकबाजारभाव
#maharashtrashetkari
#महाराष्ट्रशेतकरी
Информация по комментариям в разработке