जेव्हा तुमची आजी "पद्मश्री" बनते |Goddess of Forest| Tulsi Gowda

Описание к видео जेव्हा तुमची आजी "पद्मश्री" बनते |Goddess of Forest| Tulsi Gowda

ना पायात चप्पल ना अंगावर महागडी वस्त्रे सुरकुतलेल्या चेहऱ्यावर केवळ एक निरागस हास्य ..आयुष्यभर कष्टाने झिजवलेल्या ह्या हातात पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपती ह्या आजीचा गौरव का करताहेत?

कर्नाटकाच्या कोकण पट्ट्यात अंकोला तालुक्यातील तुलसी गौडा ह्यांनी आजपर्यंत लाखो झाडांची रोपटी रुजवून जंगल पुन्हा उभे केले...
Living Encyclopaedia of the forest म्हणून ओळखली जाणारी तुलसी झाडांशी बोलते...
जंगलात कधी कसे कुठे आणि नेमके कोणते झाड लावावे ह्याचे एखाद्या पर्यावरण तज्ञालाही मागे टाकेल इतके ज्ञान तिला आहे
कर्नाटक च्या state forest department ने तिच्या ह्याच कौशल्यामुळे तिला घेऊन अनेक वर्षे वृक्ष लागवडीचे काम दिले.तिने लावलेल्या रोपट्याचे आज हजारो वृक्ष बनले आहेत...

जगClimate change च्या विळख्यात सापडले असताना जल जंगल आणि जमीन हेच जीवन मानून जगणारी ही साधी भोळी रान माणसे आणि त्यांच्या निसर्ग पूजक संस्काराचा हा सन्मान आहे...
Save Earth चे नारे देऊन आणि climate chnage परिषदा भरवून निसर्ग वाचत नसतो तुमच्या देशातील शेतकरी मच्छीमार आदिवासी लोकांची जीवनशैली आणि संस्कृती जपली गेली तरच निसर्ग वाचतो...त्यांच्या जगण्याचा कार्बन footprint शून्य आहे आणि
आनंद शंभर टक्के...

#tulsigowda #uttarkannada #padmashree

Комментарии

Информация по комментариям в разработке