Fish Curry / अगदी हॉटेलसारखी झणझणीत मास्यांची भाजी

Описание к видео Fish Curry / अगदी हॉटेलसारखी झणझणीत मास्यांची भाजी

मास्याची भाजी
साहित्य

अर्धा किलो मासे

मॅरीनेशनसाठी
१) आल लसुण पेस्ट
२) एक चमचा लिंबुंचा रस
३) पाव चमचा हळद
४) चार चमचे तांदुळाच पीठ
५) पाव चमचा धणेपुड

मसाल्यासाठी
१) सुकयालाल मिरच्या ( बारीक ५ते ६ जाड २ )
२) एक कांदा पातळ उभा चिरलेला
३) ५ ते ६ लसुणाच्या पाकळ्या
४) अर्धा इंच आल
५) चार चमचे धने
६) २ चमचे रोस्टेड चणादाळ (दाळ्या )
७)४ते ५ लवंग
८) ३ते४ काळी मीरी
९) ५ते ६ वेलच्या
१०) कोथबीर
११) चवीपुरता मीठ
१२) अर्धा चमचा गरम मसाला

कृती _
सर्वात आधी मासे मॅरीनेट करून घ्यावेत मॅरीनेशनसाठी असलेल सर्व साहित्य मास्यामध्ये एकत्र करून घ्यावेत व मास्याच्या प्रत्येक तुकडयाला मसाला एकसारखा लावुन घ्यावा नंतर १५ते २० मिनिट झाकुन फ्रिजमध्ये ठेवावे आता सर्व सुके मसाले भाजुन घ्यावेत व मिक्सरच्या जार मधुन मसाला बारीक करून घ्यावा मासे मॅरिनेट झाल्यावर तव्यावर फ्राय करून घ्यावेत आता तयार मसाला गरम तेलात छान तळुन घ्यावा मसाला तळुन झाला की त्यात आवश्यक ते नुसार पाणी घालाव नंतर चवीनुसार मीठ घालाव झाकण ठेवुन उकळी काढुन घ्यावी नंतर त्यात वाटलेली वाळ व फ्राय केलेले मासे घालावे १०ते १५ मिनिट भाजी छान शिजवुन घ्यावी त्यात कोथंबीर घालुन गॅस बंद करावा तयार भाजी गरमागरम भाकर अथवा चपाती सोबत वाढावी

Комментарии

Информация по комментариям в разработке