गांडूळ खत निर्मिती प्रकल्प पूर्ण माहिती गांडूळ खत कसे तयार करावे?

Описание к видео गांडूळ खत निर्मिती प्रकल्प पूर्ण माहिती गांडूळ खत कसे तयार करावे?

गांडूळ खत निर्मिती प्रकल्प पूर्ण माहिती गांडूळ खत कसे तयार करावे ? गांडूळ खत #Vermicompost #Vermiculture गांडूळ खत कसे तयार करावे ?
गांडूल खत प्रकल्पासाठी किती खर्च येतो ?

गांडूळ खत प्रकल्प माहिती

गांडूळ खत बेड्स

गांडूळ खतसाठी कोणते शेण घ्यावे ?

गांडूळ खतसाठी कोणता गांडूळ घ्यावा ?

गांडूळ खतसाठी पाण्याचं नियोजन कसं करायच ?

गांडूळ खत तयार होण्यासाठी किती दिवस लागतात ?

गांडूळ खत किंमत | gandul khat price

गांडूळ खताचे फायदे
गांडूळ खत प्रकल्प माहिती

तर मित्रांनो गांडूळ खत प्रकल्प हा उभारण्यासाठी आपल्याकडे एक पुरेशी १ किवा २ घुन्ठा दमट व हवेशीर जागा असणे आवश्यक आहे,ज्यामध्ये आपल्याला एक खाली दाखवलेल्या चित्रासारखा एक पत्र्याचा शेड बांधायचा आहे,शेड हा आपण आपल्या गरजेनुसार बांधणार,म्हणजेच जर तुम्हाला फक्त तुमच्या शेतीसाठीच गांडूळ खत तयार करायचे असेल तर तुम्ही एक बारीक पत्र्याचा शेड देखिल उभा करू शकत आणि जर तुम्हाला एक व्यवसायाच्या दृष्टीने गांडूळ खत प्रकल्प उभा करायचा असेल तर तुम्ही एक मोठा ३२ बाय १०० चा किवा १०० बाय ४० चा एक शेड मारू शकता,जेणेकरून तुम्हाला गांडूळ खताचा साठा हा खुप मोठया प्रमाणात करता येईल.आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे शेड बांधताना आपण शेड हा दक्षिण-उत्तर या दिशेनी बांधा कारण पूर्व आणि पश्चिम या दिशेने सर्याचा प्रकाश हा जास्त येते असतो आणि त्याचा त्रास आपल्या गांडूळ खताला न होण्यासाठी आपण हा प्रकल्प दक्षिण-उत्तर या दिशेनी बांधा तसेच गांडूळ खत व्यवस्थित राहण्यासाठी आपण शेड ला एक हिरव्या रंगाची नेट देखील बांधू शकता जेणेकरून हवा व पाणी आत घुसणार नाही, तसे पाहयला गेल तर गांडूळ खत शेती ही जास्त खर्चिक बाब नाही पण जर तुम्ही एक व्यवसायाच्या दृष्टीने पाहत असाल तर तुम्ही खुप मोठ्या प्रमाणात काम करू शकता
gandul khat
गांडूळ खत बेड्स
शेड बांधल्यानंतर आपल्यला गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड मध्ये एक चौकोनी आकाराचे उभे बेड्स तयार करावे लागतात,हे बेड्स आपण घरी सुद्धा विटांचे बांधकाम करून करू शकतो,शेतकरी बंधूंनो सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिले तर तुम्हाला बारा बाय चार बाय दोन फुट या आकाराचे HDPE BEDS त्या ठिकाणी आलेले दिसून येतील याच्यामध्ये जवळजवळ शेतकरी बंधूंनो दीड टना पर्यंत त्या ठिकाणी तुमचा कच्चामाल बसतो आणि याच्यामध्ये फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हाला गांडूळ खत तयार झालेले त्या ठिकाणी दिसून येते,आपल्यला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण बेड्स तयार करू शकता किवा विकत घेऊ शकता,खुप सारे शेतकरी दोन्ही पद्धतीच्या बेड्स चा वापर करून गांडूळ शेती करतात.आणि जर तुम्ही जरा डोक लावल तर अगदी कमी खर्चात देखिल तुम्ही चांगले बेड्स तयार करू शकतात
gandul khat bed
गांडूळ खतसाठी कोणते शेण घ्यावे ?
बेड्स तयार केल्यानंतर आत्ता आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासठी लागणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जनावरांच शेन,खुप सारी लोक ही गांडूळ खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जनावरांच शेन वापरतात पण जर आपल्यला गांडूळ खत कमी दिवसात जास्त प्रमाणात तयार कयायचं असेल तर आपण म्हशीच शेन वापरू शकता आणि म्हशीच शेण हे गांडूळ खतासाठी एक योग्य शेन म्हणून ओळखले जाते,परंतु गांडूळ कथासाठी आपण पूर्णपणे ताज शेण देखिल वापरलं नाही पाहिजे व पुर्णपणे कुजलेल शेण देखिल वापरलं नाही पाहिजे म्हशीच शेन घेताना कमित कमी १५ ते २० दिवसाच जुन शेण आपण घेणार व दोन महिन्याच्या आतील शेण आपण घेणार,आपला गांडूळ खत प्रकल्प जर मोठा असेल तर आपण म्हशीच शेण हे विकत देखिल घेऊ शकता
शेण घेतल्यानंतर आपल्याला ते शेण बेड्स मध्ये पुर्णपणे पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवून झाल्यानंतर आपल्याला त्या शेणावर साधारणपणे दोन ते तीन दिवस १०० लिटर इतक पाणी मारायचं आहे व ते शेणखत आपल्याला गार करायचं आहे.१५ ते २५ च्या आसपास आपल्याला त्या शेणाच tempreture हे ठेवायचं आहे,जास्त गरम ही नाही व जास्त थंड ही नाही अस आपल्यला त्या शेणाच वातावरण ठेवायचं आहे.आणि त्यानंतरच आपण त्यात गांडूळ टाकणार
गांडूळ खतसाठी कोणता गांडूळ घ्यावा ?
तर मित्रांनो गांडूळाचे खुप सारे प्रकार आहेत जमिनीत भरपूर प्रकारचे गांडूळ असतात पण त्यापैकी Eisenia fetida (आयसेनिया फेटिडा) ही गांडूळाची जात भरपूर प्रमाणात गांडूळ खत निर्मीती मध्ये वापरली जाते,कारण हे गांडूळ शेण जास्त जलद गतीने खातात जेणेकरून एक दाणेदार गांडूळ खत तयार होत तर आपण ही Eisenia fetida ही गांडुळे शेणामध्ये घालु शकता
गांडूळ खतसाठी पाण्याचं नियोजन कसं करायच ?
तर मित्रांनो साधारणपणे आपण एका बेडमध्ये ५ किलोच्या आसपास गांडूळ सोडु शकतो. एकदा गांडूळे शेणात टाकल्यानंतर आत्ता आपल्याला पाण्याच नियोजन करण खुपच महत्वाच आहे कारण आपण जर पाणी जास्त प्रमाणात वापरलं तर त्यामुळे त्या शेणातील गांडूळांची हालचाल होत नाही व ती गांडुळे मरून जातात त्यामुळे पाण्याचं नियोजन हे योग्य असायला पाहिजे पाण्याचं नियोजन हे आपल्याला फक्त १५ दिवसासाठीच करायचं आहे,आपण दररोज १५ ते २० लिटर पाणी मारू शकतो, ते पण आवश्यक ते नुसार आपल्यला त्या शेणाला पाणी घालायचं आहे एकदा खत तयार होण्यास सुरवात झाली की आपल्यला त्या खताला पाणी घालयचं नाही आणि जर आपण पाणी घातलं तर ते खत शेणात पुन्हा मिसळत व परत गांडुळे ते खत खत नाहीत.त्यामुळे पाण्यचा नियोजन चागलं पाहिजे
गांडूळ खत तयार होण्यासाठी किती दिवस लागतात ?
त्यानंतर गांडूळ खत तयार होण्यसाठी कमीत कमी २५ ते ३0 दिवसांचा कालावधी लागतो
ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
#ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке