राज्यातले तीन तोंडी पोकलॅन्ड सरकार हे राज्याची तिजोरी लुटत आहेत-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Описание к видео राज्यातले तीन तोंडी पोकलॅन्ड सरकार हे राज्याची तिजोरी लुटत आहेत-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

नंदुरबार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नासिक विभागीय आढावा बैठकीसाठी, नंदुरबार येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांची संवाद साधताना, आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात माहिती दिली आहे. राज्यातले तीन तोंडी पोकलॅन्ड सरकार हे राज्याची तिजोरी लुटत असून, लोकांच्या घामाच्या पैशाची उधळण करुन हे स्वतचा गवगवा करुन घेत असल्याची टिका कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, आज नंदुरबारमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता आढावा बैठकीवेळी त्यांनी पत्रकारांना संबोधीत केले, बदलापुर घटनेमधले सीसीटीव्ही फुटेजच या लोकांनी गायब केल्याचा आरोप करत, या प्रकरणावरुन त्यांनी सरकारला टिकेचे लक्ष केले आहे, राज्यातील सत्ताधारी महाराष्ट्र हा गुजरात धार्जिना करण्याचा प्रयत्न करत असून, गुजरातमधले ड्रग्ज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणायचे, आणि इथले उद्योग तिथ पाठवायचे अस करत महाराष्ट्रातले सरकार गुजरातला नतमस्तक असल्याची टिका देखील नाना पटोले यांनी केला आहे, राज्यातील आदिवासी, ओबीसींचे आरक्षण सुरक्षीत राहीले नाही, राज्यातील आरक्षण संपण्याचे काम भाजपाने सुरु केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे, राज्यामध्ये भ्रष्ट्राचाराचे सर्व विक्रम सत्ताधाऱयांनी मोडले असून, राज्यातील तिजोरी लुटून राज्यातील कर्ज लादून सरकार चालवल्या जात आहे, बदलापुरमधल्या घटनेमध्ये ज्या नराधमाणे बलात्कार केला, ती शाळा भाजपा आणि आरएसएस विचारांची आहे, त्यामुळेच पोलीसांवर हे प्रकरण उघडूनये यासाठी दबाव होता, पालक संस्था चालकांकडे गेल्यानंतर त्यांनी देखील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, 12 आणि 13 तारखेला घटना झाल्यानंतर त्या काळामधले सीसीटीव्ही फुजेट या लोकांनी गायब केले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे, मुख्यमंत्री 15 तारखेला बदलापुरला गेले, मात्र या चिमुरडीच्या त्रासाकडे त्यांनी देखील दुर्लक्ष केले, काही सामाजीक संस्थांनी दबाव आणल्यानंतर पोलीसांनी नाईलाजाने गुन्हा दाखल केला आहे, पोलीस कारवाई करत नाही, आरोपींना पकडल जात नाही म्हणून जनआंदोलन उभे राहीले असल्याचे सांगत, तिथे कुठल्याही पक्षाचा राजकीय चेहरा नव्हता असे नाना पटोल म्हणालेत, मात्र सरकार हे आंदोलन राजकीय प्रेरीत असल्याचे सांगत, यात विरोधक राजकारण करत असल्याचा कांगावा करत आहे, मात्र हा राजकारणाचा विषयच नाही, हा सावित्रीबाई फुलेचा महाराष्ट्र आहे, यापुढे शी कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून सरकार ने काळजी घ्यायला हवी, सरकाच या विषयाच राजकारण करत आहे, लाडक्या बहिणीच्या नावाने 470 कोटी प्रसार माध्यमांसाठी खर्च करत आहे, इथे लोकांच्या हाताला काम नाही आणि तुम्ही जनतेच्या घामाचा पैसा उडवत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे, राज्यातील सत्ताधारी लोकांच्या पैशाची उधळपट्टी करुन स्वतचा गवगवा करुन घेत आहे, बदलापूर मधल्या आंदोलनात लोकांनी सांगितले तुमचे दिड हजार नको पण आमच्या मूली आम्हाला सुरक्षीत हव्यात, हे सरकार तीन तोंडी पोकलॅन्ड असून राज्याची तिजोरी लुटत असल्याचा घणाघाती यावेळी नाना पटोलेंनी केला, बदलापुर केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकमांच्या नियुक्तीला आम्ही विरोध केला आहे, उज्वल निकम हा भाजपाचा कार्यकर्ता आहे, शाळा भाजप आणि आरएसएसची आहे, त्यामुळेच उज्वल निकम सरकारी वकील नसावा ही भुमिका आमची आहे, मात्र उज्वल निकम स्वतच स्वतची वकीली करत आहे, बदलापुरच्या पोलीस निरीक्षक महिला आहे, तरी त्यांनी या प्रकरणाकडे दबावाखाली सोईस्कर दुर्लक्ष केले, सरकार आपले पाप लपविण्यासाठी आर के सिंग यांची एसआयटीवर नियुक्ती झाली आहे, एखादा स्वच्छ प्रतिमेचा आयपीएस अधिकारी एसआयटीवर नेमणुक झाला पाहीजे, असे नाना पटोले यावेळी म्हणालेत, 2014 ते 2024 काळात 22 हजार मुली आणि लहान मुलांवर अत्याचाराची प्रकरणे घडली आहे, महाराष्ट्रातल सरकार हे असंविधानिक आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकिल्ल्यावरुन वननेशन निवडणूकांची भाषा करत होते, मात्र चार राज्यांच्या निवडणूका होत्या म्ही दोनच राज्यांच्या निवडणुका का जाहीर केल्या, असा सवाल करत लोकशाहीची थट्टा करणारी व्यवस्था सत्ताधारी भाजपाने उभारली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे, महाविकास आघाडी ने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, सरकारला जनतेच्या दबावाखाली वठणीवर आणण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे, त्यामुळेच याबंद मध्ये सर्वांनी पुढाकार घेतला पाहीजे असे नाना पटोले म्हणालेत, अनेक योजनांचे पैसे सरकारने दिले नसल्याने रखडले आहे, राज्यात महाविकास आघाडी हा चेहरा असणार आहे आणि तसेच आम्ही निवडणूकीस सामोरे जाणार आहे, दिल्ली बोर्डाच्या परिक्षेच्या कालावधीत आम्ही राज्य बोर्डाच्या परिक्षा घेत नाही, यामुळे मुलांना संधी मिळते, मात्र या सरकारने मुला मुलींची चेष्टा करण्यासाठी दोन्ही परिक्षा एकाच कालावधीत घेतल्या आहे, शिकलेले मुल ओव्हरऐज होवून त्यांची संधी जाणार त्यामुळेच ते आंदोलन करत आहे, मुलामुलींचा जीवनमरणाचा प्रश्न असल्याने काँग्रेस एमपीएससी आंदोलकांच्या समवेत आहे, तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचे राज्य सरकारने ठाणल आहे, असे देखील पत्रकार परिषदेतून नाना पटोले म्हणाले आहेत, लाडकी बहिण पेक्षा चांगली सक्षम योजना आमचे महाविकास आघाडीचे सरकार आणेल, निवडणूका जाहीर झाल्या की आम्ही योजना जाहीर करु, हे सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहे, अशी लाडकी बहिण योजने वर अप्रत्यक्ष टिका देखील नाना पटोले यांनी केली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке