माणदेशाची शान असणाऱ्या माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये | madgyal sheep | snn marathi

Описание к видео माणदेशाची शान असणाऱ्या माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये | madgyal sheep | snn marathi

माणदेशाची शान असणाऱ्या माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये | madgyal sheep | snn marathi

#marathi_news #snn_marathi #madgyal_sheep #माडग्याळ_मेंढी
#farmer_news #शेतकरी_ब्रँड #dakhkhani #दख्खनी

महाराष्ट्रात दख्खनी , मडग्याळ या जातीच्या मेंढ्या प्रमुख्याने आढळून येतात. दख्खनी मेंढ्या मांस उत्पादनासाठी चांगल्या असतात. मडग्याळ मेंढ्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात आणि हे माडग्याळ मेंढयांचे खास वैशिष्टये आहे.

सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यात मडग्याळ (mandgyal) या गावात आणि सभोवतालच्या कवठेमहांकाळ (kavthemankal), रांजणी (ranjani) या भागात या मेंढ्या आढळून येतात. मडग्याळ या गावावरून या मेंढ्यांना हे नाव दिले गेले.

या मेंढ्या दख्खनी (dakhkhani) मेंढ्यांपेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मानेच्या असतात. यांच्या शरीराचा रंग पांढरा असून त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. या जातीच्या मेंढ्यांची वाढ चांगली असून, बरेचसे पशुपालक या जातीच्या नराचा पैदाशीसाठी वापर करताना दिसतात.

या मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन हे ३ ते ३.५ किलो असते. तर तीन महिने वय असताना त्याचे वजन १८ ते २२ किलो तर , सहा महिन्याचे झाल्यावर २५ ते ३० किलोपर्यंत जाते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलोपर्यंत जाते. वजन वाढीचा दर प्रति दिवस १७० ते २४० ग्रॅम इतका असतो. यांच्या नर आणि मादींना शिंगे येत नाहीत. या मेंढ्यांपासून लोकर आणि दूध ही कमी मिळत असते. या मेंढ्यांच्या शरीरावर लोकर फार कमी प्रमाणात असते.
या मेंढ्याच्या शरीराची वाढ जोमाने होते. मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन ३ ते ५ किलो असते. तीन महिने वयाच्या वेळचे वजन २२ किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो इतके असते.

Комментарии

Информация по комментариям в разработке