Datta ye Dhavuni | दत्ता ये धावुनी | प. प. श्रीमद वासुदेवानंदसरस्वतीस्वामी महाराज विरचित पद

Описание к видео Datta ye Dhavuni | दत्ता ये धावुनी | प. प. श्रीमद वासुदेवानंदसरस्वतीस्वामी महाराज विरचित पद

वासुदेव दत्त!

दत्ता ये धावुनी…!
प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज - आर्तता व आर्षता घनीभूत होऊन या भूतलावर वावरली.
साऱ्या जगाचे यथार्थस्वरूप प्रकाशित करणाऱ्या 'ऋतंभरेला' ही ज्यांचे रूप अगम्य अनाकलनीय झाले - असे 'सिद्धातीत महायोगी'.
हे पद - सगळीच पदे - शब्द,अर्थ व आशयाचे - सगुण व निर्गुण अश्या दोन्ही अवस्थेतील सर्वोच्च अभिव्यक्ती होय.
सगुणाचे आकलन नसणारे व निर्गुण जाणण्याचा कल नसणारे - तुम्ही आम्ही.
एखादं पद - ऐकल्यावर व ऐकताना - त्यातील शब्द - कानावर किती पडलीत? अंतःकरणात किती झिरपलीत? हा प्रश्न पडायला हवा - हृदयस्थ गुरुदेवांच्या साक्षित्वाने अनुसंधानाच्या वाटेवर - आत्मसंवादाच्या निमित्ताने उकलायला हवा.
रचनेतील आर्तता कळल्याशिवाय त्या गाता येत नाहीत तसेच ऐकताही येत नाही. ही पदे ऐकणे म्हणजे स्वर,ताल व लयाच्या निमित्ताने 'मनोरंजन' नव्हे - तर 'मनोजागरण' होय.

या पदांच्या निमित्ताने अजाण, हतबल व भ्रमितावस्थेतून जागृत झालेली मने - हीच मने परमोच्च 'गुरुतत्वाचे' वहन करू शकतात - आपल्या साऱ्यांनाच 'मानसा' कडचा प्रवास घडवून आणू शकतात.
जाणीवपूर्वक सुरू झालेला 'मानसा' कडचा प्रवास - ज्यात परमहंसरुपाने गुरुदेवांची 'नित्य क्रीडा' चालते - ते 'परमजाणिवेचे अधिष्ठान'.
ही 'मानसे'च दिशारुपी वस्त्र नेसलेल्या - चराचरात व्यापून असलेल्या गुरुतत्वाला पाहू शकतात - जाणू शकतात.
निर्विकल्पाकडे जाण्याचा - मुनित्वाला प्राप्त करण्याचा मार्ग प्रशस्त करू शकते.
मुनित्व - सगुण व निर्गुण जाणून - 'ओलांडून' - आत्मस्थितीच्या अनुसंधानाने प्राप्त होणारी सहजमौनावस्था.
'मना'ला 'मौना'कडे घेऊन जाणारा हा मार्ग गुरुदेवांच्या कृपेशिवाय - त्यांनी हात धरून नेल्याशिवाय कळणारा नाही.

अध्यात्ममार्गातील अतिशय गहन आणि विस्तृत भूमिका मांडणारी प.प. श्रीमद् थोरल्या स्वामींची ही अतीव आर्त अशी रचना होय.

संकल्पना व मार्गदर्शन: श्री .अजित कृष्ण तुकदेव .
वेद वासुदेव प्रतिष्ठान- अध्यक्ष
संगीत व गायन - सौ.कल्याणी आमलेकर, कुळकर्णी.
संगीत संयोजन व साऊंड मिक्सिंग : श्री. श्रीकांत पिसे. नागपूर
बासरी : श्री. अरविंद उपाध्ये.
तबला व सरोद : श्री.नीरज तातेकर.
व्होकल रेकॉर्डिंग : श्री. अजिंक्य श्रौती.पुणे

Комментарии

Информация по комментариям в разработке