रोजचा नाष्टा 6 | अस्सल चवीची पुणेरी मिसळ पाव / झणझणीत कटाची मिसळ Puneri misal recipe & kandepohe re

Описание к видео रोजचा नाष्टा 6 | अस्सल चवीची पुणेरी मिसळ पाव / झणझणीत कटाची मिसळ Puneri misal recipe & kandepohe re

रोजचा नाष्टा 6 | अस्सल चवीची पुणेरी मिसळ पाव / झणझणीत कटाची मिसळ Puneri misal recipe & kandepohe recipe | saritaskitchen

रोज जेवणात काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच? पण त्याही आधी प्रश्न असतो की आज नाष्टा काय बनवू ? नाश्ता हा जेवणाचा अविभाज्य घटक आहे |
सकाळचा नाश्ता जेवढा लवकर करू आणि जेवढा पौष्टिक तेवढा आपला दिवस चांगला जातो | दिवसभर ताजेतवाने राहतो | असं म्हणतात सकळचा नाश्ता पोटभर असेल तर तो व्यवस्थित पचतो , आणि अंगी लागतो दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते |
एकवेळ रात्रीचे जेवण नसेल किंवा अगदीच साधे असेल तर चालते पण सकळचा नाष्टा पौष्टिक , आणि परिपूर्ण पोटभरीचा असेल तर तब्येत चांगली राहते|
महाराष्ट्रियन घरांमध्ये शक्यतो सकाळचा नाश्ता प्रामुख्याने पोहे असतात , म्हणून या #रोजचानाष्टा सिरीज चा श्री गणेशा आपण कांदे पोहे बनवून केला | आणि आज आपण नाष्टाचा एक पोटभरिचा प्रकार बनवतोय , फक्त पोटभरीचा नव्हे तर सर्वांच्या आवडीची मिसळ पाव रेसिपी पाहणार आहोत .
तसे तर मिसळ चे बरेच प्रकार आहेत , कोल्हापुरी मिसळ रेसिपी जी एकदम झणझणीत तर्रीदार असते , नाशिकची मिसळ जी नाशिकचा स्पेशल काळा मसाला वापरुन बनवली जाते. नाशिकची मिसळ सुद्धा मस्त झणझणीत तर्रीदार असते फक्त नाशिकच्या मिसळ पाव मध्ये फरसान न वापरता शेव वापरली जाते .
कोल्हापुरी मिसळ फक्त मटकी वापरुन बनवतात आणि मिसळ देताना बटाटा भाजी आणि फरसान आणि कट दिला जातो. मिसळ मध्ये अजून बरेच प्रकार आहेत जसे की कोल्हापुरी मिसळ , पुणेरी मिसळ , गावरान झणझणीत मिसळ , कटाची मिसळ , दही मिसळ आणि भरपूर काही. आज आपण अस्सल पुणेरी चवदार मिसळ बनवतोय.
मिसळी चे सर्व प्रकार थोड्या फार फरकाने बनवले जातात आणि देताना वाढताना पद्धती थोड्या वेगवेगळ्या आहेत . तसेच मसाला सुद्धा वेगळा असतो , कोल्हापुरी मिसळ मध्ये कांदा लसूण मसाला , नाशिकची मिसळ मध्ये काळा मसाला तर पुणेरी मिसळ मध्ये गोडा मसाला वापरुन मिसळ पाव बनवली जाते .
पुणेरी मिसळ मध्ये पिवळी बटाटा भाजी, कांदे पोहे आणि त्यावर मिक्स कडधान्य उसळ आणि वर फरसान घालून कट दिला जातो. आज तीच तर्रीदार चवदार झणझणीत कटाची पुणेरी मिसळ कशी बनवायची ते पाहुयात . इथे मी अगदी बटाटा भाजी रेसिपी , कांदे पोहे रेसिपी , पासून मिसळ मसाला वाटण बनवणे ही संपूर्ण पद्धत सांगितली आहे .

साहित्य :- (3-4 लोकाना पुरेल असे आहे )
कांदेपोहे रेसिपी / kandepohe recipe
पोहे / pohe 1 cup
तेल / oil 2 tsp
जिरे मोहरी
कढीपत्ता
मिरची / green chilli 2
हिंग / asafoetida
हळद / turmeric 1/4 tsp
कांदा / onion 1 med
मीठ / salt
साखर /sugar 1 tsp

बटाटा भाजी रेसिपी /batata bhaji recipe :-
बटाटा उकडलेला / boiled potato 2
तेल / oil 2 tsp
जिरे मोहरी
हिंग / asafoetida
कढीपत्ता / curry leaves
हिरवी मिरची / green chillies 2
कांदा / onion 1 med
मीठ / salt
हळद / turmeric

मिसळ पाव रेसिपी / misal paav recipe :-
तेल / oil 2 tsp
मोहरी / mustered seeds 1/4 tsp
जिरे / cummin 1/4 tsp
कांदा / onion 1 large
टोमॅटो / tomato 1 med
हिंग / asafoetida
हळद / turmeric 1/4 tsp
मोड आलेली मटकी / sprouted moth 1 &1/2cup
भिजवलेले हरभरे / soaked chana 1/4 cup
भिजवलेले वाटणे / soaked green pease 1/4 cup
मीठ / salt
आले लसूण हिरवी मिरची पेस्ट / ginger , garlic green chilli paste 2 tsp

वाटण / vatan
तेल / oil 1 tsp
सुके खोबरे / dry coconut 3 tbsp
कांदा / onion 2 large
टोमॅटो / tomato 1 large

मिसळीचा कट / misal tarri :-
तेल / oil 3tbsp
तयार वाटण / ready misal masala
गोडा मसाला / goda masala 3 tsp
मिरची पावडर / red chilly powder 2 tsp
कोथिंबीर / fresh corriander
गूळ /jaggery 1 tbsp

मिसळ वाढताना / serving
तयार कांदेपोहे / kandpohe
बटाटा भाजी / batata bhaji
मिसळ फरसान / misal farasan
बारीक चिरलेला कांदा / onion
कोथिंबीर / fresh corriandar
मिसळ कट / misal kat

tar saritas kitchen recipes / saritarecipes madhye aapan rojacha nashta series chalu karat aahot. tyamadhye aapan roj agdi patkan honara aani poushtik nashtyache prakar pahnar ahot tyamule aapan hi #rojchanashta series chalu keli aahe. ya series madhye aapan maharashtrian swayampak, maharashtrian nashta recipes banvnyacha prayatn karnar aahot pan tyasobat, south indian breakfast recipes, gujarathi nashta recipes, healthy and quick nashta recipes.

aaj saritas kitchen recipes mahdye banavatoy assal puneri misal pav recipe. there are veriety of misal recipes, kolhapuri zanzanit misal recipe, nashik misal recipe, assal puneri misal recipe. Masala use in misal recipes is diff , kolhapuri misal pav we use kanda lasun masala, in nashik misal we use kala masala, and in puneri misal we use punerri special goda masala.
Also misal serving method is diff. Today we are going to see how to make assal chavdar puneri misal. we are goinng to make kandepohe recipe, batata bhaji recipe and misalicha kat recipe. we will be making this misal using goda masala. taste like nashta centre misal pav

Topic learned in this video :-

1) misal pav recipe / puneri misal recipe / assal zanzanit puneri misal / katachi misal recipe
2) batata bhaji recipe / potato sabji recipe
3) misalicha kat recipe / misal pav vatan recipe
4) kandepohe recipe / kande pohe recipe / maharashtrian kandepohe
5) how to make misal pav and how to serve?

#रोजचानाष्टा #सकाळचानाष्टा #पुणेरीमिसळरेसिपी #अस्सलचवदारपुणेरीमिसळ #कटाचीमिसळ #झणझणीततर्रीदारमिसळरेसीपी #मिसळपावरेसिपी #punerimisalrecipe #kolhapurimisalrecipe #misalpavrecipe #saritaskitchen #saritasrecipes #nashta #kandepohereciepe

Комментарии

Информация по комментариям в разработке