गुप्तहेर बहिर्जी नाईक समाधी, बाणूरगड (भूपालगड) Banurgad Fort,Bhupalgad Fort.

Описание к видео गुप्तहेर बहिर्जी नाईक समाधी, बाणूरगड (भूपालगड) Banurgad Fort,Bhupalgad Fort.

गुप्तहेर बहिर्जी नाईक समाधी, बाणूरगड (भूपालगड) Banurgad Fort,Bhupalgad Fort. बहिर्जी नाईक यांच मृत्यु कसा झाला. #Bahirji #BahirjiNaik #Bhupalgad #Banurgad

किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते.
लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळगड.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अफझलखानाच्या (दि. १० नोव्हेंबर १६५९)ला झालेल्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला. नंतर त्याची डागडुजी झाली. भूपाळगडाची किल्लेदारी शिवरायांनी फिंगोजी नर्साळा या अनुभवी सहकाऱ्याकडे दिली.

भूपाळगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे. याच्या एका कोपऱ्यावर बाणूरगड गाव वसलेले आहे. गावातून पायवाट गडावर जाते येथून पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येऊन पोहोचते. या तलावाजवळूनच गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची वाट आहे. टेकडीसमोरच महादेवाचे मंदिर लागते, मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग असून ते बाणूर्लिंग या नावाने ओळखले जाते.

मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हातास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी दिसते.
हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला; तर काहींच्या मते दूरवरच्या शत्रूचा घाव वर्मी बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येऊन प्राण सोडले.
समाधी समोरून जाणाऱ्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर गजची तटबंदी पहायला मिळते; दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत.
भूपाळगड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते.
लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळगड.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अफझलखानाच्या (दि. १० नोव्हेंबर १६५९)ला झालेल्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला. नंतर त्याची डागडुजी झाली. भूपाळगडाची किल्लेदारी शिवरायांनी फिंगोजी नर्साळा या अनुभवी सहकाऱ्याकडे दिली.

भूपाळगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे. याच्या एका कोपऱ्यावर बाणूरगड गाव वसलेले आहे. गावातून पायवाट गडावर जाते येथून पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येऊन पोहोचते. या तलावाजवळूनच गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची वाट आहे. टेकडीसमोरच महादेवाचे मंदिर लागते, मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग असून ते बाणूर्लिंग या नावाने ओळखले जाते.

मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हातास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी दिसते.
हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला; तर काहींच्या मते दूरवरच्या शत्रूचा घाव वर्मी बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येऊन प्राण सोडले.
समाधी समोरून जाणाऱ्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर गजची तटबंदी पहायला मिळते; दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत.
भूपाळगड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.

https://www.bensound.com

Комментарии

Информация по комментариям в разработке