हा जन्म पुन्हा नाही... एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथांवर कोणताच तोडगा नाही!

Описание к видео हा जन्म पुन्हा नाही... एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथांवर कोणताच तोडगा नाही!

हा जन्म पुन्हा नाही...
एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथांवर कोणताच तोडगा नाही!
(विधानसभा हिवाळी अधिवेशन । मुंबई । गुरुवार, दि. 23 डिसेंबर 2021)

राज्य सरकारने एसटी संपाबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने एसटीचा संप चिघळला
विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये राज्य सरकावर टीका
प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचार थांबला तर एसटी फायद्यात येईल!

0:00- एसटी कर्मचाऱ्यांचा संप अचानक झालेला नाही
धुळ्यामध्ये पगार मिळत नसल्याने एसटी चालकाने आत्महत्या केली. नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी आणि जळगावमधील चालक आणि कंडक्टरने आपले जीवन संपवले. केवळ संप म्हणून या घटनेकडे पाहणे अयोग्य. पगार वेळेवर न होणे, कोणतेही सहकार्य न मिळणे अशा अनेक घटना घडल्या, त्यातूनच चीड. 6000 कर्मचारी निवृत्त, अनेकजणांचा मृत्यू पण त्यांना मदत मिळाली नाही. 21 सप्टेंबरला संगमनेरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याची बसमध्ये आत्महत्या. एसटीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न सुटू शकतो, त्या संदर्भात दुसरे काय पर्याय असू शकतात याची चर्चा राज्य सरकार आणि विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली होती. मात्र सरकारला विलिनीकरणाच्या प्रश्नावर निर्णयच घ्यायचा नाही अशी भूमिका असल्याने संप चिघळला. राज्य सरकार एसटीच्या प्रश्नाबाबत पुढे आले असते तर संप चिघळला नसता.

2:31- एसटी महामंडळामध्ये ईटीआय मशीन्सचा घोटाळा
एसटी महामंडळाची अवस्था अशी का झाली हे तपासून पाहण्याची गरज. ईटीआय मशीनचा घोटाळा. 2500 कोटीच्या मशीन्स. नेहमी गुजरातबाबत वेगळ्या प्रकारची भावना. मात्र ईटीआय मशीन्स घोटाळ्यामध्ये गुजरातची एक कंपनी पात्र ठरली पाहिजे म्हणून प्राधान्य दिले गेले. त्याकरता अटीशर्ती झाल्या. आधी निविदा, मग मंजुरी घ्या, अशाप्रकारचा शेरा. त्यानंतर कापड खरेदी, सीट खरेदीमध्ये 2500 कोटींचा घोटाळा, शेवटी घोटाळा बाहेर आल्यानंतर सरकारकडून स्थगिती.

3:40- एसटीतील भ्रष्टाचाराबाबत प्रशासनाने आडमुठी भूमिका न घेता कारवाई करावी
एसटीमध्ये स्थानिक स्तरावर स्पेअर पार्टसची खरेदी. कुठेही टिकणारे स्पेअर पार्टस नाहीत. एकेका बसचे स्पेअर पार्टस 4 वेळा बदलले गेले. तर एसटी कशी नफ्यामध्ये येईल?
#WinterSession #Mumbai #Maharashtra #WinterSession2021 #ST #STStrike #एसटीसंप #एसटी
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Комментарии

Информация по комментариям в разработке