Bacchu Kadu, Hitendra Thakur ते Abu Azmi, Vidhan Parishad निवडणुकीत यांची भूमिका कशी निर्णायक ठरणार?

Описание к видео Bacchu Kadu, Hitendra Thakur ते Abu Azmi, Vidhan Parishad निवडणुकीत यांची भूमिका कशी निर्णायक ठरणार?

#BolBhidu #MaharashtraVidhanParishad2024 #MahayutivsMVA

२० जून २०२२ ची विधान परिषद निवडणूक. याच निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि तेव्हापासून विधान परिषदेच्या निवडणुकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं. आता १२ जुलैला विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यानं एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. त्यामुळंच मतांचा कोटा जुळवण्यासाठी सगळ्याच पक्षांचा आटापिटा सुरू आहे. काँग्रेस सोडली तर प्रत्येक पक्षाला आपले सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. कोणाचे आमदार फुटणार, कोण क्रॉस वोटिंग करणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यामुळं २०२२ प्रमाणंच यावेळची विधान परिषद निवडणूकही इंटरेस्टिंग होणार आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत महत्वाचा रोल प्ले करतात ते छोटे पक्ष आणि अपक्ष. एक-एक महत्वाचं असल्यानं या आमदारांची मतं आपल्या बाजूनं ठेवण्यासाठी सगळेच पक्ष आता कामाला लागले आहेत. गुप्त मतदान असल्यामुळं हे आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं सध्या या आमदारांकडं सगळ्यांचं लक्ष आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडं अपक्ष आणि छोट्या पक्षांचं किती पाठबळ आहे आणि या निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी काय असणार, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке