‼️ श्री स्वामी समर्थ ‼️
⚜️🛑अति महत्वाचे 🛑⚜️
श्री गुरुचरित्र पारायण करताना खालील नियम पाळावे
१) ब्रम्हचार्य पालन करावे
२) मांसाहार व परअन्न वर्ज्य करावे
३) जनन शौच, मृत शौच असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये
४) घरात काही अडचण आल्यास (मासिक पाळी, सुतक ) गुरुचरित्र अर्धवट सोडू नये दुसऱ्या व्यक्ती कडून पूर्ण करून घ्यावे.
५)आहारा संमंधीचे नियम स्वइच्छेने पाळावे.
६) काळे वस्त्र परिधान करु नये
संकल्प -गुरुचरित्र वाचनापूर्वी हातात तांदूळ व पाणी घ्यावे खाली एक ताम्हणं ठेवावे व आपल्या मनातली इच्छा सांगावी व नंतर ते पाणी ताम्हणात सोडून तुळशीला घालावे.
टीप -पारायनास बसणाऱ्यांनी आदल्या दिवशी १ गाय व चार कुत्रे यांना पोळी (चपाती) चा नैवद्य खाऊ घालावा.
रोज पारायण झाल्यावर सिद्धमांगल स्तोत्र म्हणावे व संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम म्हणावे .
गुरु चरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे नियम..
पारायण काळात 7 दिवस खालील अन्न खावे
1. एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती
2. पालेभाजी खाऊ शकतात.. ज्यात लाल माठ, हिरवा माठ, राजगीरा, पालक,करडई, कोथिंबीर, कडीपत्ता..
3. फळभाज्या खाऊ शकतात (बटाटा , टॉमॅटो,फ्लावर, कोबी, घोशाळ (गिलके ), ढोबळीमिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर ,सुरण, रताळे)
4. फळे सर्व फळे खाऊ शकतात. (कडू वर्ज्य)
5. तेल सुर्यफुल व करडई तेल वापरू शकतो. (शेंगदाणा तेल . सोयाबीन तेल वापरू नये)
6. मसाला मध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकतात. (गरमसाला, कोरडा गरा मसाला वर्ज्य)
7. दुध, दही, ताक, कढी खाऊ शकतात.
8. पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात (शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा,राजगिरा खाऊ शकतात)
9. वर्ज्य : द्वीदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी, खाऊ नये . गवार, वांगे, कारले, वाल,शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य.
10. चहा, कॉफी घेऊ शकता..
11. पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा खाऊ नये..
!! श्री स्वामी समर्थ !!
Информация по комментариям в разработке