Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।

Описание к видео Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।

Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।

#Gondkalin_Chandrapur #chandrpur
#Chandrapur_aadivasi_vibhag
#Chandrpur_Govt #Chandrpur_Killa # Chandrpur_Temple

सृष्टी कालचक्रासोबत निरंतर चालत आहे . दिवस रात्र, महिने, वर्षे , युगं , संवत्सर … माणसांची उत्क्रांती झाली … त्याची संस्कृती निर्माण झाली … मोठमोठी साम्राज्ये निर्माण झाली … सम्राट झाले … जगज्जेते निर्माण झाले … राज्ये वैभवाप्रत गेली… संगीत,शिल्प , नृत्य, नाटक, … माणसं आली … गेली … पिढ्या आल्या … आपला ठसा उमटवून काळाच्या ओघात संपून गेल्या … माणूस बदलत राहिला पण कालचक्राने आपल्या उदरात जपून ठेवला त्या त्या काळाचा वारसा … त्या त्या काळातील वैभवाच्या खुणा … त्या त्या काळातील माणसाची दृष्टी … त्या त्या काळावर आपल्या असीम पराक्रमाची कोरलेली कर्तृत्वगाथा.

चंद्रपूरच्या गोंड राजवंशाची आपल्या पाचशे वर्षाच्या राजवटीत आपल्या कुशल , प्रजाहितदक्ष आणि व्यापक दृष्टीने निर्माण केलेल्या वास्तू, मंदिरं , जलाशय आजही त्यांच्या भव्यतेला गवसणी घालणाऱ्या सौंदर्यपूर्ण दृष्टीची सह देत चंद्रपूर नगरीत उभ्या आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке