महाराष्ट्राची ग्रामीण जीवनशैली सातासमुद्रापार नेणाऱ्या जोडप्याची गोष्ट Ft.

Описание к видео महाराष्ट्राची ग्रामीण जीवनशैली सातासमुद्रापार नेणाऱ्या जोडप्याची गोष्ट Ft.

ही गोष्ट आहे एका अशा जोडप्याची ज्यांनी आपल्या मातीत काहीतरी नवीन घडवण्यासाठी मुंबईहुन गावाकडे स्थलांतर केले. शहरातली lifestyle सोडून गावातील पारंपारिक जीवन, महाराष्ट्रीयन पाककृती, इथली समृद्ध संस्कृती, स्थानिक कला यांना जगासमोर वेगळ्या पद्धतीने मांडणे या उद्देशाने सुरू केलेलं एक आगळं वेगळं YouTube channel... @RedSoilStories म्हणजेच लाल मातीतल्या गोष्टी.... शाश्वत जीवनाच्या शोधात एक कलात्मक रित्या केलेला प्रवास; शहरी जीवनाच्या गर्दीपासून दूर. आधुनिकीकरणाच्या मागे लागलेल्या पिढीला पुन्हा ग्रामीण भागातील शाश्‍वत जगण्‍याचा मार्ग दाखवण्‍याचे, इथल्या culinary art ला asthetically सुंदर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न...
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य, इथल्या नद्या, डोंगर , दऱ्या, धबधबे, इथली माती, त्यात उगणारी पिके हे सगळेच एक कथा सांगतात... आणि ह्याच कथा आपल्यासाठी घेऊन हे जोडपं दर आठवड्याला भेटायला येत...
"Red Soil Stories" हे फक्त एक you tube channel नसुन ग्रामीण जीवन आणि हे न अनुभवता येणाऱ्या शहरातल्या तमाम लोकांसाठी बनवलेला साकव आहे... मी सुद्धा शिरिष आणि पूजा ला भेट देऊन त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या venture बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सोबत Red Soil Stories channel साठी एक व्हिडिओ सुध्दा शूट केलाय... जो तुम्ही त्यांच्या चॅनेल वर पाहू शकता... Red Soil Stories channel ला भेट देऊन नक्की तुमचा अनुभव कळवा🙏❤️
   / redsoilstories  




https://instagram.com/redsoilstories?...
Instagram👆🏼

https://www.facebook.com/profile.php?...
Facebook

Email id - [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке