Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть भटाळा येथील प्राचीन शिव मंदिर |Bhatala Temple | Bhatala Mandir| Ancient Temples Chandrapur| Warora

  • Explore with Dr. Jayant Wadatkar
  • 2021-08-01
  • 15079
भटाळा येथील प्राचीन शिव मंदिर |Bhatala Temple | Bhatala Mandir| Ancient Temples Chandrapur| Warora
Bhatala TempleBhatala Shiv mandirAncient Temples around ChandrapurTemple WaroraOld Temple near TadobaBhatala Village near WaroraTemples in VidarbhaAncient Temples in VidarbhaVidarbha HistoryVidarbha TourismChandrapur Tourist PlacesChandrapur Historical PlacesTemple near WaroraShiv Temple BhatalaJayant WadatkarExplore Vidarbha
  • ok logo

Скачать भटाळा येथील प्राचीन शिव मंदिर |Bhatala Temple | Bhatala Mandir| Ancient Temples Chandrapur| Warora бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно भटाळा येथील प्राचीन शिव मंदिर |Bhatala Temple | Bhatala Mandir| Ancient Temples Chandrapur| Warora или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку भटाळा येथील प्राचीन शिव मंदिर |Bhatala Temple | Bhatala Mandir| Ancient Temples Chandrapur| Warora бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео भटाळा येथील प्राचीन शिव मंदिर |Bhatala Temple | Bhatala Mandir| Ancient Temples Chandrapur| Warora

भटाळा येथील प्राचीन शिवमंदिर
– डॉ. जयंत वडतकर 9822875773
नागपूर चंद्रपूर मार्गावरील टेंभूर्डा गावापासून थेट ताडोबा कडे जाणारा रस्ता आहे. या मार्गावर भटाळा नावाचे गाव लागते. गावाबाहेरून जाणाऱ्या रस्त्यालगत एका उंच टेकडीवर असलेले प्राचीन मंदिर आपले लक्ष वेधून घेते. गावात प्रवेश केला कि ग्रामपंचायच्या प्रवेशव्दार कमानीतून मंदिराकडे रस्ता जातो. समोरच थोड्या उंचीवर एक भव्य मंदिर दिसते. मंदिरासमोर असलेले मोठाले त्रिशूल बघून हे मंदिर शिवाचे आहे हे लक्षात येते.
मंदिर अतिशय उंच असूनही त्यावर शिखर नसल्याने थोडे वेगळे वाटते. शिखर नसल्याने स्थानिक लोक यांस भोंडे देऊळ असे म्हणतात. समोरील फरसबंद पटांगणातून थेट मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाचे व्दारातच एका मागे एक असे लागून चार खांब असून यातील आतील खांबावर सुबक नक्षीकाम असून बाहेरील खांब मात्र तितके सुबक केलेले नाहीत. अंतराळ जरा निमुळते आणि लांबट असून मध्यात काळ्या पाषाणातील नंदी बसविलेला आहे. अंतराळाच्या छतावर सुद्धा नक्षीकाम केलेले आहे.
समोर अंधारा गाभारा असून गाभाऱ्याचे व्दार पंचशाखा प्रकारातील आहे. यातून प्रवेश केला की समोरच भव्य आकाराचे गर्भगृह असून मध्यात भव्य आकाराचे शिवलिंग आहे. चार फुट उंच आणि ८-१० फुट लांब आकाराचे शिवलिंग हे या मंदिराचे खास वैशिष्ट. हे मंदिर राक्षसांनी बांधले असून ते सहा महिन्याची रात्र आणि सहा महिन्याचा दिवस असतांना, एका रात्रीत हे मंदिर बांधून काढले मात्र रात्र संपल्याने काही भाग बांधण्याचा राहून गेल्याने मंदिर अर्धवट सोडून राक्षस निघून गेले अशा काही आख्यायिका या मंदिराबद्दल आहेत.
मंदिर पूर्वमुखी असून उंच मंदिराच्या बाह्य भिंती सपाट आहेत. बाह्य भिंतीतील काही स्थर कोरीव काम केलेले आहेत. मंदिराचे शिखर सपाट असून मंदिराचे बांधकाम लालसर पाषाणाच्या मोठाल्या शिळांनी केलेले आहे. अंतराळाच्या बाह्य भिंतीवर डाव्या व उजव्या बाजूवर देवकोष्ट असून त्यामधील मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. गर्भगृहाच्या तीन भिंतीवर मोठाले देवकोष्ट असून त्यामध्ये कार्तिकेय, शिव आणि चामुंडा या देवतांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. मंदिराची शांकुळी उत्तरेस असून या बाजूवरील भिंतीत, छतावरील पाणी बाहेर पडण्यास दगडी पन्हाळी सुद्धा दिसतात.
मंदिरासमोर काही पाषाणातील मूर्ती आणि चारही बाजूनी प्रतिमा असलेली चौरस आकारातील विरगळ बसविलेली दिसते. स्तंभ विरगळ किंवा चतुर्भुज विरगळ अशी ओळख असलेला हा विरगळ हा प्रकार साधारणता यादव काळातील असावा असे मानल्या जाते. मंदिराच्या अंतराळावर आणि गर्भगृहावर निमुळते शिखर नसल्याने मंदिराचा कालखंड निश्चित करणे अवघड असले तरी गावात आढळणाऱ्या विविध पाषाण मूर्तीवरून मंदिर निर्मितीचा कालखंड साधारण दहावे शतक म्हणजेच राष्ट्रकुट काळातील असावा असे तज्ञांचे मत आहे
गावात अनेक ठिकाणी पाषाणातील शिल्प आणि मूर्ती पडून असलेल्या दिसतात, गावात पूर्वी भुईकोट किल्ला सुद्धा होता, याशिवाय या गावात एक देवीचे मंदिर आणि काही लेण्या सुद्धा सापडल्या असल्याने भटाळा हे गाव प्राचीन काळात फार महत्वाचे नगर असावे असे मानल्या जाते.
Markanda Dev Temple, Gadchiroli District

Camera & Gear used –
1) Video shoot with : Canon Power Shot SX50HS
2) Photographs - Canon Power Shot SX50HS

Music credits-
YouTube Library - https://www.youtube.com/audiolibrary/...
Find Google Earth software at https://www.google.com/earth/desktop/
Category –Education

#Bhatala#BhatalaMahadev Temple#Shiv Mantiri#Bhatala Near Warorar#Temples Near Tadoba#Temples in Chandrapur#Vidarbha Temples#TemplesinVidarbha#Vidarbha Tourism#ExploreVIDARBHA#History of Vidarbha#

Explore Historical Forts and Temples, Historical and unknown places, nature & Wildlife of Vidarbha

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]