श्री रामाचा सुमधुर पारंपरिक पाळणा | बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथनंदना |

Описание к видео श्री रामाचा सुमधुर पारंपरिक पाळणा | बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथनंदना |

#रामाचापाळणा
#बाळाजोजोरेकुलभुषणा
#ramnavami
#ramachapalana
#रामजन्मोत्सव
#बाळाजोजोरे
#बारशाचीगाणी
#barse
#ramjnmsong

श्री रामाचा पारंपरिक पाळणा

बाळा जो जो रे, कुलभुषणा l दशरथनंदना ll
निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा ll धृ ll
बाळा जो जो रे....
पाळणा लांबविला अयोध्येसी l दशरथाचे वंशी ll
पुत्र जन्माला ऋषीकेशी l कौशल्येचे कुशी ll १ ll
बाळा जो जो रे....
रत्नजडित पालख l झळके अलौकिक l
वरती पहुडले कुलदीपक l त्रिभुवननायक ll २ ll
बाळा जो जो रे....
हलवी कौशल्या सुंदरी l धरुनी ज्ञानदोरी ll
पुष्पे वर्षिली सुरूवरी l गर्जती जयजयकारी ll ३ ll
बाळा जो जो रे....
विश्वव्यापका रघुराया l निद्रा करी बा सखयां ll
तुजवर कुरवंडी करुनिया l सांडीन आपुली काया ll ४ ll
बाळा जो जो रे....
येऊनी वसिष्ठ सत्वर | सांगे जन्मांतर |
राम परब्रह्म साचार l सातवा अवतार ll५ ll
बाळा जो जो रे....
याग रक्षुनिया अवधारा l मारुनी रजनीचरा ll
जाईल सीतेच्या स्वयंवरा l उध्दरी गौतमदारा ll६ ll
बाळा जो जो रे....
परिणिल जानकी स्वरूपा l भंगुनिया शिवचापा ll
रावण लज्जित महाकोपा l नव्हे पण हा सोपा ll७ ll
बाळा जो जो रे....
सिंधुजलडोही अवलीळा l नामे तरतिल शिला ll
त्यांवरी उतरुनि दयाळां l नेईल वानरमेळा ll८ ll
बाळा जो जो रे....
समुळ मर्दूनी रावण l स्थापिल बिभीषण ll
देव सोडवील संपूर्ण आनंदेल त्रिभुवन ll९ ll
बाळा जो जो रे....
राम भावाचा भुकेला l भक्ताधीन झाला l
दास विठ्ठले ऐकिला l पाळणा गाईला ll१० ll
बाळा जो जो रे....

Комментарии

Информация по комментариям в разработке