Chandan Vandan Fort - चंदन वंदन गड | अपरिचित गड | सातारा | Marathi Vlog | संपूर्ण माहिती

Описание к видео Chandan Vandan Fort - चंदन वंदन गड | अपरिचित गड | सातारा | Marathi Vlog | संपूर्ण माहिती

Chandan Fort is located in Satara District. This fort is situated on a hilly spur from the main ridge of Sahyadri. This fort is frequently visited by trekkers and pilgrims. The villages at the base are rich in sugarcane and other cultivation. The Chandan and Vandan are adjacent forts. The trek to both the fort can easily be completed in a day.

According to the evidence from the manuscripts found written on copper plates, the Chandan and Vandan forts were built by King Bhoj-II of Shilahar Dynasty in 1191-1192. King Shivaji won these forts from Adilshah of Bijapur in 1673. However, according to the latest studies published by Akhil, Maharashtra Itihas Parishad, and Bharat Itihas Sanshodhak Mandal, the first fort captured by Chatrapati Shivaji was Chandan after he took an oath at Raireshvar. An old temple of shiva in the Rohideshvar area in the village of Raireshvar. It was under the control of the Marathas until 1689, after which it passed in the hand of Moghuls. It was again won by the Marathas before 1695 and Aurangzeb had to fight again to recapture it in 1701. In 1707, it was finally captured by Chatrapati Shahu Maharaj.

The fort is in good condition. The main entrance gate is in ruins, There is a Gaus Pak Baba (Mebub-e-Subhani) Dargah, water cistern, and bastion on the fort. There is an old Shiva temple on the fort with two Linga sculptures. Every year in the month of Shravan there is a festival celebrated by nearby villages. The path to the fort passes through an open area devoid of any vegetation. This fort has a peculiar stone piled structure. The path on the fort passes between the piles. On the southern part of the fort are three rooms built-in stone without any roof. They are believed to be store rooms.


इतिहास
इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसओबत यांना देखील स्वराज्याट सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मधे फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका , २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमराहाराजांनी स्न १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठिण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरुज आपणास प्रवेशाद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पायऱ्या पार गेले असता डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड” म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते. ( येथून दहा एक पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मोठ्या मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात.) वंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे आंधकाम आढळते. एका अर्धवट दरवाजासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते. याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस आरुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकऱ्यांच्या मते हेकोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

गडावर जाण्याच्या वाटा
चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यावर जाणाऱ्या सयुंक्त वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथे उतरून २० कि.मी. अंतरावर किकली गाव आहे. वाई-सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची. येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन. या चंदन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

राहाण्याची सोय
दर्गात रहायचे असल्यास ३०-४० जणांना राहता येते.

जाण्यासाठी लागणारा वेळ
गडावर जाण्यासाठी अडीच ते ३ तास लागतात

Комментарии

Информация по комментариям в разработке