लातूर शहरात दुकानावर छापा; २२ पोती गुटखा लागला हाती !

Описание к видео लातूर शहरात दुकानावर छापा; २२ पोती गुटखा लागला हाती !

लातूर शहरात दुकानावर छापा; २२ पोती गुटखा लागला हाती !

एक ताब्यात: खबऱ्याच्या माहितीनंतर पोलिसांची कारवाई

लातूर : छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री करणाऱ्या लातुरातील एका दुकानावर पोलिस पथकाने छापा मारला. या छाप्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या २२ पोत्यांत गुटखा आढळून आला असून, एकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लातूर दहशतवाद विरोधी शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंगद कोतवाड यांनी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. खबऱ्याने अवैध गुटखा विक्रीबाबत माहिती दिली की, नाईक चौक ते छत्रपती चौक मार्गावर डाव्या बाजूला शुभम ट्रेडिंग कंपनी नावाच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधित तंबाखूची
विक्री केली जात आहे. या माहितीची - खात्री केल्यानंतर पोउपनि. आयुब शेख, पोउपनि. वाय. एस. मुंडे, सपोउपनि. - अंगद कोतवाड, सहायक फौजदार - जाधव, पोलिस हवालदार शेख यांनी - अचानकपणे शुभम ट्रेडिंग कंपनी - नावाच्या दुकानावर छापा मारला. - यावेळी एकाला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने शुभम शामसुंदर बाहेती (२६ रा. जानवळ ता. चाकूर ह.मु. एलआयसी कॉलनी, लातूर) असे आपले नाव सांगितले. पंचनामा केल्यानंतर खताचे पांढऱ्या रंगाचे ११
पोत्यात केशरयुक्त पानमसाला, ११ पोत्यात सुगंधित तंबाखूच्या पुड्या अशा एकूण २२ पोत्यांमध्ये १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल घटनास्थळी आढळला. तो पोलिसांनी जप्त केला. यावेळी एकाला ताब्यात घेतले.
याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीत छापासत्र...

लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई केली जात आहे.

गत तीन ते चार महिन्यांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांचे छापासत्र सुरू आहे. वेगवेगळ्या छाप्यात, कारवाईत पोलिसांनी लाखो रुपायांचा गुटखा जप्त केला आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке