Daraba | जिभेवर ठेवताच विरघळणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा बनवायची पारंपारिक खान्देशी पद्धत

Описание к видео Daraba | जिभेवर ठेवताच विरघळणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा बनवायची पारंपारिक खान्देशी पद्धत

नमस्कार,
Jalgoan Tadka Recipe मध्ये आज आपण दिवाळी विशेष दराब्याचे लाडू कसे तयार करायचे? ते बघणार आहोत ..या लाडूंना दळाचे लाडू..ओलावलेल्या गव्हाचे लाडू असे सुद्धा म्हणतात..दराब्याचे लाडू हि एक पारंपरिक खांन्देशी रेसिपी आहे..दिवाळीच्या फराळासाठी तसेच लग्न कार्यामध्ये रुखवत देण्यासाठी हे लाडू बनवले जातात... दराब्याचे लाडू तीन ते चार महिने अजिबात खराब होत नाही ..हे लाडू खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात... व्हिडिओमध्ये मी गव्हाची पिठी /सुजी कशी तयार करायची? ती साठवायची असेल तर कशा पद्धतीने साठवायची ?दराबा कसा तयार करायचा? संपूर्ण दाखवलेल आहे ..तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा.. रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा.. कॉमेंट्स करा..चॅनेलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ..शेजारील बेल 🔔आयकॉनवर प्रेस करा ..आणि आॅल वर क्लिक करा..


Daraba | जिभेवर ठेवताच विरघळणारा लोण्यासारखा मऊ लुसलुशीत दराबा बनवायची पारंपारिक खान्देशी पद्धत | Dalache ladu | ओलवलेल्या गव्हाचे लाडू

👉 साहित्य -
गहू - 3 शेर
पिठी / सोजी - 2.5 शेर
पिठी साखर - २ शेर( आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल )
साजूक तूप - 1 किलो
बारीक रवा - १ वाटी ( कमी जास्त घेता येईल)
वेलदोडे किंवा वेलची पूड
जायफळ पुड

💠किलोचे प्रमाण -
२ किलो - गहू
१ किलो - सोजी ( पिठी )
१ किलो - पिठी साखर
३ पाव ( ७५०ग्रॅम ) - साजूक तूप
रवा - १ वाटी ( आवडीनुसार कमी अधिक करता येईन )


१). शक्यतोवर रात्रीच्या वेळेस गहू ओले करावे.. म्हणजे ते रात्रभर व्यवस्थित ओलवले जातात.. आणि गव्हाचा कोंडा निघून पांढरी स्वच्छ सोजी किंवा गव्हाचे पीठ तयार मिळते..

२). आंबवले गेलेले गहू जर जास्त ओले असतील तर कपड्यावर ते पसरत ठेवावे आणि कोरडे करून घ्यावे.‌‌ हे गहू खूप जास्त कोरडेही नसावे आणि खूप जास्त ओले ही नसावे.. दमट असावेत..

३). गहू जर खूप जास्त ओले असतील तर गव्हाचा कोंडा खूप निघतो.. रवा जास्त पडतो.. आणि गव्हाची पिठी किंवा सोजी खूप कमी तयार होते .

३). गहू कसे आंबवले गेले (गहू जास्त ओले) दळून आणले तर त्यानुसार पिठी /सुजीचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते..

४). गव्हाची पिठी दोन ते तीन वेळा व्यवस्थित चाळून घ्यावी म्हणजे त्यातला गव्हाचा कोंडा किंवा ताम निघून जाते ..गव्हाचे ताम जर राहिली तर दराब्याचे लाडू लालसर होतात..


५). गव्हाची पिठी तयार झाल्यानंतर ती सहा ते सात तास किंवा एक दिवस मोकळी ठेवावी आणि वाळवून घ्यावी..मग लाडू करायला घ्यावे.. कारण गव्हाची ही पिठी थोडी ओलसर असते त्यामुळे तिला आधी वाळवून घ्यावी..

६). जर लाडू वळून ठेवायचे असतील तर तूप कमी घेतलं तरी चालेल..आणि लाडू न वळता दराबा तसाच डब्यामध्ये भरून ठेवायचा असेल तर जास्त तूप घ्यावे लागते ..म्हणजे दराबा लुसलुशीत तयार होतो..


७). लुसलुशीत दराबा तयार करण्यासाठी तुम्ही एक किलो सुजी साठी एक किलो तूप घेऊ शकता.


८). एक किलो सुजी /पिठी साठी ६०० ग्रॅम तूप आणि ६०० ग्रॅम साखर हे प्रचलित प्रमाण आहे..


९).सुजी कमी भाजली गेल्यास लाडू चिकट होतात..मंद आचेवर अगदी तूप सुटेपर्यंत सुजी व्यवस्थित भाजून घ्यावी.. सुजी जास्त भाजली गेल्यास लाडू लालसर होतात.. म्हणून सुजी मंद आचेवरच योग्य पद्धतीने भाजावी..

१०). भाजून घेतलेली पिठी दहा ते बारा तास तुपामध्येच राहू द्यावी.. म्हणजे ती छान मूरते आणि लाडू स्वादिष्ट तयार होतात.‌( वेळ नसेल तर पूर्ण गार झाली की साखर घालू शकता.)


११). भाजून घेतलेली पिठी/ सोजी पूर्णपणे थंड झाल्यावरच साखर घालावी.? गरम सोजी मध्ये साखर घातल्यास ती वितळून सुजी पातळ होते‌. आणि लाडू कडक तयार होतात...

१२).पिठी भाजून झाली की अल्यूमिनीयम कढई मध्ये जास्त वेळ ठेवू नये ..आणि दडबा रगडण्यासाठी सुद्धा अल्यूमिनीयम चे भांडे वापरू नका ...त्यामुळे दराबा थोडा सावळा दिसतो.. पांढराशुभ्र दिसत नाही..


👉गव्हाची पिठी किंवा सोजी कशी साठवावी?

१). सुजी आधी वाळून घ्यावी नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रिज मध्ये तुम्ही एक ते दोन महिना साठवून ठेवू शकता‌‌ अजिबात खराब होत नाही..

२). गव्हाची पिठी ओलवलेल्या गव्हाची असल्यामुळे ती फ्रीजच्या बाहेर लवकर काळी पडते म्हणून आधी वाढवून घ्यावी आणि मग साठवावी...

लिंक ✔️ चेक करा.👇🏼


बेसनाचे लाडू |Besan Ke Ladoo| How to make Besan Laddu | Diwali special Recipe |Jalgaon Tadka Recipe

   • बेसनाचे लाडू |Besan Ke Ladoo| How to ...  

Anarsa Recipe Marathi |विदर्भातील पारंपारिक साखरेचे जाळीदार अनारसे |Anarse Recipe |Diwali Faral

   • Anarsa Recipe Marathi |विदर्भातील पार...  

अनारसे रेसिपी |१/२ किलो तांदळाचे अचूक प्रमाण या टिप्स वापरून करून बघा,अनारसे फसणार नाही|Anarse

   • अनारसे रेसिपी |१/२ किलो तांदळाचे अचूक...  

मैद्यामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी | shankarpali

   • मैद्यामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनव...  

शंकरपाळी | Shankarpali By Jalgoan Tadka Recipe |Diwali Faral | Tea Time snack

   • शंकरपाळी | Shankarpali By Jalgoan Tad...  


झटपट तांदळाच्या पिठाची खुसखुशीत चकली | बिना भाजणीची चकली 😋| Instant Rice Flour Chakli😍

   • झटपट तांदळाच्या पिठाची खुसखुशीत चकली ...  

या दोन वस्तू घालून शेवांचे पीठ तयार कराल तर शेव संपेपर्यंत कुरकुरीतच राहतील| spicy Shev|Diwali snack

   • या दोन वस्तू घालून शेवांचे पीठ तयार क...  

दिवाळी फराळासाठी फक्त बेसनाचे ठिसूळ,कुरकुरीत तिखट शेव |Lasun shev |Diwali Faral

   • दिवाळी फराळासाठी फक्त बेसनाचे  ठिसूळ,...  

रव्याची मठरी

   • दिवाळी स्पेशल १० मिनिटात बनवा १ कप रव...  

खुसखुशीत करंजी रेसिपी | पिठात घाला हि एक वस्तू आणि बनवा संपेपर्यंत खुसखुशीत करंजी |Karanji recipe

   • खुसखुशीत करंजी रेसिपी | पिठात घाला हि...  

स्वस्तात मस्त 15 मिनिटात तयार होणार कुरकुरीत चविष्ट मुरमुरा चिवडा | murmuryacha chivda| Diwali faral

   / alank3ty  



#khandeshirecipe
#Darabarecipe
#Darabyacheladoo
#Diwalifaral
#JalgoanTadkaRecipe
#दराबा
#दळाचेलाडू



Please like share and Subscribe with bell icon 🔔


Thanks For Watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке